काहीही मागणी केली तरी सीबीआय चौकशीसाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

सध्या सर्वांचे लक्ष कोरोनाकडे असायला हवे, चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. शाळा आणि कॉलेज संदर्भात १५ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री याबाबतचा निर्णय घेतील. लसीकरणाला गती मिळाली आहे, त्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.

    पुणे: भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीने काल अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, कुणी काहीही मागणी केली की चौकशी होत नाही. सीबीआय चौकशीसाठी मात्र राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल.
    माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली त्याबाबतही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.  ते म्हणाले की, सध्या सर्वांचे लक्ष कोरोनाकडे असायला हवे, चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. ते म्हणाले की, “मी याबाबत जास्त बोलू इच्छित नाही. संबंधित यंत्रणा तपास करत आहे. चुकीच्या वेळेला चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. सर्वांचे लक्ष कोरोनाकडे असायला हवे.

    शाळा आणि कॉलेज १५ जुलैपर्यंत बंद
    दरम्यान, सवलती दिल्यानंतर पॉझिटिव्ह रेट कमी झाला. मात्र सध्या सुरु असलेले निर्बंध कायम राहतील, असेही गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले. तिसरी लाट ही चिंतेची बाब ते म्हणाले की, शाळा आणि कॉलेज संदर्भात १५ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री याबाबतचा निर्णय घेतील. लसीकरणाला गती मिळाली आहे, त्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. तिसरी लाट ही चिंतेची बाब आहे. तिसऱ्या लाटेचा धोका आहेच.