कोरोना रुग्णांना वाढीव बिले देणाऱ्या १४ रुग्णालयांना नोटीस; महानगरपालिकेची करवाई

दुसऱ्या लाटेतही बिलांच्या तक्रारी आल्या. आयुक्त राजेश पाटील यांनी खासगी रुग्णालयांच्या बिलांचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले. महापालिकेकडे विविध रुग्णालयांसंदर्भात तक्रारी आल्या. त्यानुसार बिलांची तपासणी केली. दुसऱ्या लाटेत १४ रुग्णालयांनी वाढीव बिले दिल्याचे आढळून आले. त्यांना महापालिकेने नोटीस बजावली आहे.

    पिंपरी: कोरोना काळात लूट करणाऱ्या रुग्णालयांविरोधात महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. वाढीव बिले देणाऱ्या शहरातील १४ खासगी रुग्णालयांना नोटीस बजाविल्या आहेत. पंधरा दिवसात वाढीव बिलांचे परतावे परत देण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

    कोरोनाच्या कालखंडात राज्य सरकारच्या सूचनेनुसार महापालिकेच्या वतीने खासगी रुग्णालयांना उपचारासाठी परवानगी देण्यात आली. ही परवानगी देताना राज्य शासनाने निर्धारित केलेले शुल्क आकारवेत असे सूचित केले. शहर परिसरात शासकीय आणि खासगी अशी एकूण १३७ रुग्णालये आहेत. त्यात पहिल्या लाटेत वाढीव बिलांच्या तक्रारी आल्यानंतर तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बिलांचे परीक्षण करण्यासाठी समिती नियुक्त केली होती. त्यानुसार महापालिका वैद्यकीय अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, लेखा अधिकारी यांचे पथक तयार केले होते. अतिरिक्त शंभर जणांचे मनुष्यबळ या पथकाला देण्यात आले होते. त्यानुसार या पथकाने प्रत्यक्षपणे रुग्णालयात जाऊन लेखापरीक्षण केले. ४८ रुग्णालयांना नोटीस दिल्या. त्यानंतर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली.