सायबर हल्ला प्रकऱणी टेक महिंद्रा कंपनीला नोटीस; सिमा सावळेंच्या तक्रारीची आयुक्त राजेश पाटील यांनी घेतली दखल

टेक महिंद्रा कंपनी आणि त्यांच्या भागीदार कंपन्या (क्रिस्टल इंटिग्रेटीड सर्व्हिस प्रा. लि. आणि आर्सेस इन्फोटेक प्रा.लि.) यांनी पाच वर्षाच्या काळात स्मार्ट सिटी प्रकल्पाची अंमलबजावणी आणि ऑपरेशन ची जबाबदारी घेतली आहे. करारातील अटीशर्थी त्यांच्यावर बंधनकारक आहेत. प्रत्यक्षात सायबर हल्ल्यात या अटीशर्थींचा भंग झाल्याचे सिध्द झाले आहे.

    पिंपरी: पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या सर्व्हरवर रॅन्समवेअर हल्ला प्रकऱणात नेमकी वस्तुस्थिती काय आहे त्याबाबतचा सविस्तर अहवाल तीन दिवसांत सादर करावा, अशा आशयाची एक नोटीस महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारण अधिकारी राजेश पाटील यांनी टेक महिंद्रा लिमिटेड कंपनीला गुरुवारी (१८ मार्च) दिली आहे. जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी या प्रकऱणात कारवाईची मागणी करत सतत पाठपुरावा केला आणि सखोल चौकशिची मागणी केली. पाठोपाठ शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आदी राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही या विषयावर पत्र दिले. आयुक्त राजेश पाटील यांनी त्याची तत्काळ दखल घेत टेक महिंद्रा कंपनीला नोटीस दिली.

    महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी कंपनीला दिलेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे की, या घटनेचे मूळ कारण काय ते स्पष्ट करावे. कंपनीचे काय निरीक्षण आहे ते मुद्देसूद द्या. आगामी काळात याचे काय परिणाम होणार त्याचा तपशिल द्यावा. पुन्हा सर्व परिस्थिती पर्वपदावर कशी येणार ते कळवा. स्मार्ट सिटी प्रकल्प अंमलबजावणी किती विलंब होणार त्याचा खुलासा करावा. आगामी काळात पुन्हा असा सायबर हल्ला झाला तर कोणती खबरदारी घेतली आहे आणि या पुढे काय करणार आहात याचा अहवाल तीन दिवसांत द्यावा. तसेच या सायबर हल्ल्याच्या आड पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याच बनाव करुन विमा लाटण्याचा डाव आखल्याची शंका नगरसेविका सिमा सावळे यांनी व्यक्त केली होती. या मुद्दयाची दखल घेत आयुक्त राजेश पाटील यांनी या घटनेत नेमके आर्थिक नुकसान कोणते, किती व कसे याचा तपशिल टेक महिंद्रा कंपनीकडून मागविला आहे.

    , अशीही तंबी आयुक्त राजेश पाटील यांनी दिली आहे.

    भागीदारीचा घोळ संशयास्पद

    स्मार्ट सिटी अंतर्गत विविध कामांच्या रितसर निविदा मागवून कंत्राट देण्यात आले होते. त्यात टेक महिंद्रा, क्रिस्टल इंटिग्रेटीड सर्व्हिस प्रा. लि. आणि आर्सेस इन्फोटेक प्रा.लि. या भागीदार कंपन्यांना काम दिले. त्यातील टेक महिंद्रा ही कंपनी नामांकीत तसेच उच्च तंत्रज्ञानात खूप अद्यावत असल्याने त्यांचे काम पाहून कंत्राट निश्चित कऱण्यात आले. भागीदार कंपनीत लीड पार्टनर टेक महिंद्रा असूनही एकूण कामाच्या (४४० कोटी रुपये) अवघे सुमारे ५० कोटी रुपयेंचे काम (१२ टक्के) टेक महिंद्रा कंपनीकडे आहे. त्याशिवाय क्रिस्टल इंटिग्रेटीड सर्व्हिस प्रा. लि. कडे सुमारे २२० कोटी रुपये (५० टक्के) आणि आर्सेस इन्फोटेक प्रा.लि. या कंपनीकडे १७५ कोटी रुपये (३८ टक्के) काम आहे. सर्वात कमी जबाबदारी टेक महिंद्रा कंपनीकडे असताना केवळ मुख्य भागीदार म्हणून सायबर हल्ल्याबाबतची तक्रार त्यांनी दाखल केली आहे, हे सर्वच थोडे विचित्र आणि संशयास्पद आहे, असे जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी उघड केले आहे.

    क्रिस्टल कंपनीकडे सर्वांत मोठी जबाबदारी आहे. प्रकल्पाचे इन्स्टॉलेशन, कमिशनिंग, मॅनपॉवर रिसोर्स, टेक्निकल डायरेक्शन, पूर्ण आढावा तसेच व्हेंडर कोऑरडिनेशन अशी सर्व महत्वाची जबबाबदारी क्स्टिल कंपनीकडे आहे. याचाच अर्थ सायबर हल्ला झाला त्याबाबत पुरेशी खबरदारी घेण्याची जबाबदारीसुध्दा क्रिस्टल कंपनीकडेच होती. प्रत्यक्षात फेब्रुवारी महिन्यात अगदी पहिल्या आठवड्यापासून सायबर चोरांनी रेकी केली आणि सिस्टममध्ये वारंवार ये-जा केली. कंपनीच्या रेकॉर्डला तशी नोंद आहे. सायबर हल्ला २६ फेब्रुवारीला प्रत्यक्षात झाला, पण तत्पूर्वी महिनाभरापासून हल्लेखोरांनी सिस्टमध्ये आत-बाहेर सुरू केले होते. अशाही परिस्थितीत क्रिस्टल कंपनीकडे जबाबदारी असताना त्यांना हे समजले कसे नाही, असा सवाल सिमा सावळे यांनी उपस्थित केला आहे.

    स्मार्ट सिटी चे काम या भागीदार कंपन्यांना देताना टेक महिंद्राची पात्रता उच्च दर्जाची असल्यानेच काम देण्यात आले. प्रत्यक्षात भागीदारीत टेक महिंद्रा कंपनीचा शेअर अवघा १२ टक्के असताना त्याबाबत स्मार्ट सिटीचे सल्लागार आणि महापालिकेचे अधिकारी यांना समजले कसे नाही, की माहित असून त्यांनी सोयिसाठी दुर्लक्ष केले असे अनेक प्रश्न आता उभे ठाकले आहेत. कागदोपत्री टेक महिंद्रा लीट पार्टनर असताना क्रिस्टल कंपनीचा ५० टक्के वाटा कसा याबाबत कोणीही सल्लागार, स्मार्ट सिटी च्या अधिकाऱ्यांनी शंका उपस्थिती कशी केली नाही, याचेही गूढ आहे. कदाचीतय या कामात टेक महिंद्रा कंपनी लीड पार्टनर नसती तर  हे कंत्राट यांना मिळालेत नसते, अशीही शक्यता होती. लीड पार्टनरला किमान ३४ टक्के काम असाला हवे होते, मात्र त्यांचा सहभाग अवघा १२ टक्के कसा याबाबत महापालिका आधिकाऱ्यांनी कधीही विचारणा केल्याचे दिसत नाही, असेही सिमा सावळे यांनी निदर्शनास आणून दिले.