महाराष्ट्र राज्याच्या षष्ट्यब्दी निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभाग व राजपथ इन्फ्राकॉन प्रा.लि. यांनी सातारा जिल्ह्यात ठरविलेल्या ४० किलोमीटर अंतराच्या डांबरीकरणाचा विश्वविक्रम संकल्प

सदरचा जागतिक विक्रम हा राज्याचा ६१ वर्षपूर्ती निमित्त आमच्या कंपनी तर्फे राज्यास समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. ह्याची नोंद घेण्यासाठी आमच्या कंपनी मार्फत Indian Books Of Records व Limca Books Of Records कडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

  पुणे : सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मे. राजपथ इन्फ्राकॉन प्रा.लि. पुणे, यांना HAM अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्हातील पुसेगांव ते म्हासुर्णे ह्या दरम्यानचा ४७ कि.मी. लांबीचा राज्यमार्ग बांधकाम करण्यास देण्यात आला होता. महाराष्ट्र राज्याचा ६१ वर्षपूर्ती निमित्त सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या सहकार्याने मे. राजपथ इन्फ्राकॉन प्रा.लि. पुणे, यांनी २४ तासात एकूण ३९.६९१ किलोमीटर लांबीचा बिटुमिनस काँक्रीटचा राज्य महामार्ग पूर्ण करण्याचा जागतिक विक्रम केला आहे.

  सदरचा जागतिक विक्रम हा राज्याचा ६१ वर्षपूर्ती निमित्त आमच्या कंपनी तर्फे राज्यास समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. ह्याची नोंद घेण्यासाठी आमच्या कंपनी मार्फत Indian Books Of Records व Limca Books Of Records कडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

  अशोकरावजी चव्हाण, मंत्री, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच हा उपक्रम पूर्णत्वाकडे नेण्यासाठी मनोज सौनिक, अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, यांचे तसेच त्यांचे मंत्रालयातील सर्व अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. हा जागतिक विक्रम पूर्ण करण्यासाठी आमची कंपनी रात्र दिवस प्रयत्न करत होती. जगदिश कदम, अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांनी प्रत्येक व्यक्तीने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलेले योगदानाबाबत व्यकितश: आभार मानले.

  या विक्रमाची अंमलबाजवणी करण्यासाठी मे. राजपथ इन्फ्राकॉन प्रा.लि. पुणे यांच्या तांत्रिक व अतांत्रिक पथकाने एकत्रित बसून जगदिश कदम, अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांचा मार्गदर्शना खाली सविस्तर सूक्ष्म नियोजन केले होते. आमचे कंपनीमार्फत सविस्तर नियोजन केल्यामुळे (Plan ‘A’ and Plan ‘B’) प्रत्येक काम करताना शेवटच्या क्षणी अडचणी आल्या. परंतु आमचे सूक्ष्म नियोजन असल्यामुळे आलेल्या अडचणीवर मात करून आम्ही आमचे ध्येय पूर्णत्वास नेले. या ३९.६५ कि.मी. लांबी मध्ये पसरलेल्या रस्त्याची ६ भांगामध्ये विभागणी करण्यात आली होती. या कामाची प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक भागाकरिता स्वतंत्र पथक नेमण्यात आले होते.

  या कामासाठी एकूण १५,००० + मेट्रिक टन बिटुमन काँक्रिटची गरज पडणार होती. ही गरज पूर्ण करण्यासाठी ८ हॉट मिक्‍स प्लांट तैनात करण्यात आले होते. बिटुमन काँक्रिट हे मटेरिअल पसरविण्यासाठी ८ पेव्हर, १६ टँडम रोलर व ८ PTR वापरण्यात आले. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात मटेरिअलची प्लांट पासून ते प्रत्यक्ष जागे पर्यंत वाहतूक करण्यासाठी एकूण २१५ + हायवा टिप्पर वापरण्यात आले. सदर सर्व हायवांनी २४ तासात एकूण ५००० + किमी अंतराचा प्रवास केला.

  सूक्ष्म तपशीलवार नियोजन व त्या अनुषंगाने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक भागात एक पथक नेमण्यात आले होते. सदर पथकामध्ये १ प्रकल्प व्यवस्थापकाचा समावेश होता. त्यांच्या अधिपत्याखाली ३ हायवे इंजिनियर, २ गुणवत्ता नियंत्रक इंजिनियर, २ सर्व्हेअर आणि ७१ कर्मचारी असे एकूण ७९ कर्मचारी यांचा समावेश होता. एकूण सहा भागांकरीता ४७४ कर्मचारी पूर्ण कामासाठी नेमण्यात आले होते.

  या ६ पथकाचे मार्गदर्शन करण्यासाठी व आवश्यक भासल्यास काही तातडीच्या निर्णयाची गरज पडल्यास तात्काळ निर्णय घेण्यासाठी व्यवस्थापन थिंक टँक तयार केले होते. त्याच्यामध्ये अध्यक्ष व कार्यकारी संचालक, प्रकल्प संचालक, महाव्यवस्थापक, अभियंता पथक यांचा समावेश होता व ते सर्वजण प्रत्यक्ष साईटवर पूर्ण वेळ उपस्थित राहून सर्व पथकाचे सनियंत्रण व त्यांना मार्गदर्शन करत होते.

  सदरची कामे करत असताना कामाच्या गुणवत्तेकडे पूर्ण लक्ष देण्यात आले होते. त्याकरिता आमच्या कंपनीतर्फे तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग व स्वतंत्र अभियंत्यामार्फत गुणवत्ता चाचणी नियमितपणे व शासनाचा प्रचलित मापदंडाप्रमाणे करण्यात येत होती. तसेच राज्यात कोविड १९ या आजारासाठी शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्यात येत होते.

  सदर राज्य महामार्गाचे काम करण्यासाठी आवश्यक असलेले ८ हॉट मिक्‍स प्लांट पैकी ६ प्लांट हे सदर रस्त्याच्या ४० किमी अंतराचे आत होते. परंतु २ प्लांट (गोमेवाडी व बेलकी) हे अनुक्रमे ८० किमी व १०८ किमी अंतरावर होते. या वहन अंतरा पासून प्रत्यक्ष जागेपर्यंत येणाऱ्या रस्त्याचा प्रत्येक वळणावर वाहनाला व वाहनचालकाला कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरिता प्रत्येक वळणावर एक सुपरवायझर नेमण्यात आले होते. त्यामुळे वाहन चालकास प्लांट पासून ते प्रत्यक्ष जागेपर्यंत पोहचण्यास कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही.

  इतक्या लांबचा प्रवास असतानासुध्दा कुठल्याही वाहनास तांत्रिक दृष्टया अडचण निर्माण झाली नाही. तसेच त्यांचे निरसण करण्याकरिता ५० किमी अंतराच्या आत एक पीकअप व्हॅन ठेवण्यात आली होती. त्या व्हॅनमध्ये एक पेट्रोलिंग अधिकारी व त्यांचा सोबत मेकॅनिक्सचे पथक होते. सर्व वाहनचालकाचे व पेट्रोलिंग अधिकाऱ्याचे भ्रमणध्वनी क्रमांक एकमेकांजवळ होते. त्यामुळे वाहनास कुठल्याही तांत्रिक अडचण आल्यास त्याचे जागेवरच निरासन करण्यात येत होते. याकरिता सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते. प्रत्येकाला आपापली जबाबदारी काय आहे याबाबत एक दिवस अगोदर प्रत्येक प्लांट निहाय पथकातील कर्मचारी व अधिकारी यांना पथक प्रमुखाने समजून सांगितले होते. त्यांना येणाऱ्या शंका कुशंकाचे समाधान करून देण्यात आले होते.

  सदरचे काम करतांना एकूण नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एकाही कर्मचाऱ्याने तक्रार केली नाही. सदर ध्येयाचे शिखर गाठण्यासाठी प्रत्येक कर्मचारी हा मनापासून व सदचे काम माझेच आहे या इमाने इतबारे काम करत होते. २४ तासाचे धेय गाठल्यानंतर प्रत्येक कर्मचारी व अधिकारी यांनी सर्व यंत्र सामुग्री बंद करून एकमेकाचे अभिनंदन केले.

  राजपथ इन्फ्राकॉन कंपनीची स्थापना ३२ वर्षापूर्वी म्हणजेच सन १९८८ मध्ये झाली. सुरूवातीपासून कंपनीने पायाभूत सुविधा उभारणीच्या कामांमध्ये स्वत:चा ठसा उमटविण्याचा प्रयत्न केला. ह्या राष्ट्र निर्मितीच्या कामात कंपनीचा असलेला सहभाग खारीचा वाटा असल्यासारखा आहे. परंतु या गोष्टीचा राजपथ इन्फ्राकॉन कंपनीतील प्रत्येकाला सार्थ अभिमान आहे. आजपर्यंत राजपथ कंपनीने अनेक प्रशंसनीय व गौरवाला पात्र असलेली कामे पायाभूत सुविधा उभारणीच्या क्षेत्रात केली आहे. यातील काही महत्वपूर्ण कामांची नावे खालील प्रमाणे आहेत.

  १) सन १९९८ साली आमच्या कंपनीने पुणे जिल्ह्यातील लघु पाटबंधारे प्रकल्पाचे काम २४ महिन्यांची मुदत असताना ५ महिन्यांत पूर्ण करून बोनस मिळविला.

  २) सन २००६ साली जागतिक बँक व जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करावयाच्या मुळा उजवा कालव्याच्या १४८ किलोमीटर लांबीचे पुन:स्थापनचे काम वेळेत व उत्तम गुणवत्तेसह पूर्ण केल्यामुळे जागतिक बँकेच्या कौतुकाला कंपनी पात्र ठरली.

  ३) सन २०१० मध्ये अमरावती जिल्ह्यातील खारपाण पट्टयातील (Deep Soil) राज्याच्या इतिहासातील पहिल्या क्राँकिट बॅरेजचे काम पूर्ण केले. कंपनीने केलेल्या या कामाची नोंद प्रतिभाताई पाटील, तात्कालीन राष्ट्रपती महोदया, यांनी घेतली. त्याप्रित्यर्थ राष्ट्रपती महोदयांनी राष्ट्रपती भवन येथे बोलावून आमचा उचित सन्मान केला.

  ४) सन ९०१६ मध्ये नागपूर हैद्राबाद ह्या राष्ट्रीय महार्गावरील १० वर्ष रखडलेला व दोनदा terminate झालेल्या ४ पदरी रस्त्याचे काम विक्रमी २ वर्षात पूर्ण करून NHAI कडे हस्तांतरीत केले. त्यानिमित्त लपोग यांच्याकडून Certificate of Excellence कंपनीला मिळाले.

  यासारखी अनेक पायाभूत सुविधा उभारणीतील कामे राजपथ कंपनीने गेल्या ३ दशकांमध्ये उत्कृष्टरित्या पूर्ण केलेली आहेत. त्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जागतिक बँक, NHAI, Airport Authority यांच्याकडून वेळोवेळी राजपथ कंपनीला पायाभूत सुविधा उभारणीची कामे उत्कृष्ट गुणवत्तेसह विक्रमी वेळेत पूर्ण केल्याबद्दल गौरवण्यात आले आहे.

  गुणवत्तापूर्वक उत्कृष्ट काम करण्याची परंपरा येथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मनाशी बाळगून राष्ट्र उभारणीच्या कामांमध्ये पायाभूत सुविधा क्षेत्रातील असलेला कंपनीचा छोटासा सहभाग आम्ही संकल्पित केलेला आहे. “समर्थ भारत, सशक्त भारत” या राष्ट्र उभारणीच्या संकल्पनेमध्ये Passion, Commitment, Excellence, Smart Work या गुणांसहित कंपनीचे योगदान राष्ट्र निर्मितीच्या कामात येथून पुढील काळातही समर्पित असेल असा विश्वास जगदीश कदम अध्यक्ष व कार्यकारी संचालक राजपथ इन्फ्राकॉन कंपनीच्या वतीने व्यक्त केला.

  On the occasion of the 61th anniversary of the State of Maharashtra Public Works Department and Rajpath Infracon Pvt Ltd set a world record for asphalting of 40 km distance in Satara district