चोरीच्या प्रयत्नातील एकाला दुचाकी व हत्यारसह अटक

शिक्रापूर पोलिसांची तळेगाव ढमढेरेतील कौतुकास्पद कामगिरी

शिक्रापूर : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे चोरीच्या उद्देशाने आलेल्या एका युवकाला दुचाकी व हत्यारासह जेरबंद करण्यात शिरूर पोलिसांना यश आले असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिसरातील चोरीचा डाव फसला असून एका युवकावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

-जवळील कात्री व दुचाकी केली जप्त

शिक्रापूर (ता. शिरूर) पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई रविकिरण जाधव व होमगार्ड विवेकानंद डफळ हे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास तळेगाव ढमढेरे ते शिक्रापूर रस्त्याने रात्रगस्त घालत असताना त्यांना गिताई मंगल कार्यालय समोर पोलिसांना पाहून एक युवक झाडाच्या आडोशाला लपून बसत असल्याचे रविकिरण जाधव यांच्या निदर्शनास आले,. यावेळी जाधव व डफळ यांनी मोठ्या शिताफीने त्या युवकाला पकडले त्याचेकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे पोलिसांना त्याचेवर संशय आल्याने पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याचेकडे पत्रा कापण्यासाठी वापरण्यात येणारी मोठी कात्री आणि एक दुचाकी मिळून आली. यावेळी पोलिसांनी त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव गणेश शिंदे असल्याचे सांगितले याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई रविकिरण मोहन जाधव रा. शिक्रापूर (ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी गणेश प्रकाश शिंदे वय ३० वर्षे रा. वैदवस्ती तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर)यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याचे जवळील कात्री व दुचाकी जप्त केली करत त्याला अटक केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आनंदा बाठे हे करत आहे.