वातावरण बदलाने धास्तावलाय कांदा उत्पादक शेतकरी

पुणे जिल्ह्यात वातावरणातील बदलाचा शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसून कांदा उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. तात्काळ शेतकऱ्यांचे अर्थिक नुकसान पाहता, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भरीव अनुदान देण्याची मागणी वाढली आहे.

    लोणी काळभोर : गारपीट व अवकाळी पाऊस, धुके तसेच ढगाळ वातावरणाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस व धुकेसदृश परिस्थितीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे दिवाळे निघाले आहे. पुणे जिल्ह्यात वातावरणातील बदलाचा (Climate Change) शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसून कांदा उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरी धास्तावला आहे. तात्काळ शेतकऱ्यांचे अर्थिक नुकसान पाहता, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भरीव अनुदान देण्याची मागणी वाढली आहे.

    जिल्ह्यासह पूर्व हवेलीतील कांदा उत्पादक शेतकरी नैसर्गिक वातावरण बदलाचा फटका सहन करीत आहे. डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे व धुकेसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना रोगराईने कांद्याचे पिक सोडून द्यावे लागले होते. तरीही शेतकऱ्यांनी धैर्य करुन नव्याने कांद्याच्या लागवडी व चालू स्थितीतील पिकाला मोठा खर्च करुन पिक वाढवून कांदा काढणीला आणला आहे. मात्र, अधिकचा गारठा व धुकेसदृश स्थितीने कांदा पोसलाच नसल्याने कांदा काढणीत उत्पन्नात मोठी घट झाली आहे. शेतकऱ्यांना एकरी कांदा हजार क्विंटल इतका कसबसा सापडणे मुश्कील झाल्याने शेतकऱ्यांचे अपरमित नुकसान अटळ झाले आहे. उत्पादनातील खर्च पाहता , शेतकऱ्यांना मोठे अर्थिक संकट सोसण्याची वेळ आली आहे.

    पूर्व हवेलीत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली आहे. परंतु, या लहरी हवामानाचा फटका लक्षात घेता काढणीला उत्पन्न घटल्याने कांदा उत्पादकांचे नुकसान अटळ आहे. डिसेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीत शेतकऱ्यांना कांदा सोडून द्यावा लागला आहे. तर आता कांद्याचे उत्पन्न निम्म्याहून घटले आहे. त्यामुळे राज्य सरकारने कांद्याला प्रति एकरी वीस हजार रुपये अनुदान द्यावे अशी मागणी शेतकरी सुनिल गोते यांनी केली आहे.

    ‘आमदनी अठ्ठणी, खर्चा रुपया’

    कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा एकरी खर्च चाळीस हजारांहून अधिक आहे. तर सध्याचे घटते उत्पन्न लक्षात घेता शेतकऱ्यांच्या हाती हजार क्विंटल इ. माल हाती लागत आहे. सध्या कांद्याला २५० ते ३०० रुपये क्विंटल भाव बघता शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघणे मुश्कील झाले असून, उत्पादन खर्चाच्या निम्याहून खर्च अवघड झाले आहे. त्यामुळे शेतीत आमदणी अठ्ठणी व खर्चा रुपया अशी अवस्था झाली आहे.