इंदू गोडसेंनी यांची माहिती अहमदनगर: जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीस सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षात ६ कोटी २ लाख ९४ हजार ८९८ रूपयांचा ढोबळ नफा झाला असून तरतुदी वजा जाता संस्थेस २ कोटी ६१ लाख ५१ हजार ८

इंदू गोडसेंनी यांची माहिती

अहमदनगर: जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीस सन २०१९-२०२० या आर्थिक वर्षात ६ कोटी २ लाख ९४ हजार ८९८ रूपयांचा ढोबळ नफा झाला असून तरतुदी वजा जाता संस्थेस २ कोटी ६१ लाख ५१ हजार ८ रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. संचालक मंडळाने यंदा सभासदांना शेअर्सवर १० टक्के लाभांशाची शिफारस केली आहे. कायम निधीवर ९ टक्के व्याज देण्याचाही निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. दरम्यान सध्या राज्यात असलेले कोरोनाचे सावट व सर्वत्र लागू असलेले १४४ कलम लक्षात घेऊन संस्थेने आवश्यक कायदेशीर बाबींची पुर्तता करण्यासाठी यंदा ऑनलाईन पद्धतीने वार्षिक सभा घेण्याचे नियोजन केले आहे. शनिवार (दि.२०) जून रोजी सकाळी ११ वाजता ही सभा झूम ॲपचा वापर करून सुरु होईल. ऑनलाईन वार्षिक सभा घेणारी जि.प.कर्मचारी सोसायटी ही राज्यातील पहिलीच संस्था ठरणार आहे, अशी माहिती सोसायटीच्या चेअरमन इंदू गोडसे व व्हा.चेअरमन प्रताप गांगर्डे यांनी दिली.

संस्थेच्या मागील आर्थिक वर्षातील आर्थिक कामगिरीचा लेखाजोखा मांडताना चेअरमन गोडसे यांनी सांगितले की, संस्थेने उत्कृष्ट व सभासद हिताच्या कारभाराची परंपरा कायम राखली आहे. कोविड-१९ विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर  मार्च २०२०पासून देशात व राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. कोरोना  विषाणुचा प्रसार होवू नये म्हणून  राज्यात शासनाने १४४ कलम लागू केले आहे. अशा परिस्थिती मध्ये प्रत्यक्ष सभा घेणे शक्य नाही.परंतु डिव्हिडंड व कायम निधी वरील व्याज मिळावी अशी सभासदांची आग्रही मागणी आहे. त्यामुळे  सभासदांनी ऑनलाईन पद्धतीने सभा घेण्याची लेखी मागणी केल्यानुसार संस्थेची ९३ वी आधिमंडळाची वार्षिक सर्व साधारण सभा २० जून रोजी सकाळी ११ वाजता झुम अॅपव्दारे सोसायटीच्या पदसिद्ध अध्यक्ष तथा जि.प.अध्यक्षा राजश्री घुले पा. यांच्या अध्यक्षतेखाली व संचालक मंडळाच्या उपस्थितीत व राज्य सहकारी संस्था पुणे यांचे सहकारी प्रशिक्षण अधिकारी डी.डी.सोनाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.