प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

नियमांचे पालन न करणाऱ्यांकडून रोख स्वरुपात दंड आकारण्यात येत आहे. ऑनलाइन दंड भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी सूचना नागरिकांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली होती.त्यानुसार ऑनलाइन पद्धतीने दंड भरणा करणाऱ्या नागरिकांसाठी एचडीएफसी बँकेत खाते उघडण्यात आले आहे.

    पुणे : कोरोना संसर्गात प्रशासनाकडून जारी करण्यात आलेले नियम धुडकावणाऱ्या नागरिकांकडून रोख स्वरुपात दंड वसूल करण्यात येत आहे. मुखपट्टी परिधान न करणे, दुकाने जास्त वेळ सुरू ठेवणे तसेच गर्दी करणाऱयांविरोधात दंडात्मक कारवाई सुरू आहे. नागरिकांनी केलेल्या सुचनेनंतर नियमभंग प्रकरणात आकारण्यात येणारा दंड आता ऑनलाइन स्वरुपात भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

    नियमांचे पालन न करणाऱ्यांकडून रोख स्वरुपात दंड आकारण्यात येत आहे. ऑनलाइन दंड भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी सूचना नागरिकांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली होती.त्यानुसार ऑनलाइन पद्धतीने दंड भरणा करणाऱ्या नागरिकांसाठी एचडीएफसी बँकेत खाते उघडण्यात आले आहे. त्यासाठी वाहतूक विभागातील सर्व पोलिसांना मोबाईल संच, क्युआर कोड याबाबतची माहिती देण्यात आली आहे. ऑनलाइन दंडाची आकारणी कशी करायची, याबाबतचे प्रशिक्षण वाहतूक विभागातील पोलिसांना देण्यात आले आहे.