तळेगाव दाभाडेत पावसामुळे भात पीक जोमात

तळेगाव दाभाडे: ऑगस्ट महिन्यात झालेल्या मान्सूनच्या जोरदार पावसाने मावळातील सर्वच धरणे तुडुंब ब भरली असून ततालुक्यातील पाच नद्यांना मोठे पूर आले आहेत. तर या पावसाने भात पीकजोमात आले आहे. मात्र आता पावसाने थोडी उसंत घ्यावी. अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून होत आहे. यावर्षी मान्सूनच्या पावसाने जून आणि जुलै महिन्यात चांगलाच ताण दिल्याने खरिप भात उत्पादक शेतकरी चिंतेत पडले होते. मात्र तीन ऑगस्ट नारळी पौर्णिमा पासून गेली तीन आठवडे मुसळधार पाऊस मावळ तालुक्यात कोसळत आहे. या पावसाने खरीप भात पिकाची सगळी भात खाचरे तुडुंब भरून वाहत असून भात पीक जोमात आले आहे. दररोज आणि सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाने मावळ तालुक्यातील वडीवळे, आंद्रा, कासरसाई, जाधववाडी, मळवंडी ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर पवना धरणही ८५ टक्क्यांपर्यंत भरलेले आहे. याशिवाय आढले, पुसाणे,यासारखे मध्यम प्रकल्प पूर्ण भरून वाहत आहेत.

-शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटणार
मान्सूनच्या पावसाचा जोर पश्चिम पट्ट्यात अधिक असल्याने पवना, इंद्रायणी,आंद्रा, सुधा, कुंडलिका या नद्यांना मोठे पूर आलेले आहेत. पिंपरी-चिंचवड या शहरांना आणि शेतीला पाणीपुरवठा करणारे पवना धरण लवकरच पूर्ण भरेल. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. यावर्षी मावळ तालुक्यात ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने खरीप भात पिकांच्या शंभर टक्के लागवडी पूर्ण झालेला आहे. या पावसात भात पिकही जोमात आलेले असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. गेली तीन आठवडे सलगपणे मान्सूनचा पाऊस पडत असल्याने यावर्षी भात पिकाला फायदेशीर ठरत आहे.मावळ तालुक्यातील ओढे, नाले,नद्या,तळी सर्व धरणे तुडुंब भरलेली असून प्रचंड पाणी साठा झालेला आहे. मात्र काही ठिकाणी अति पाऊस झाल्याने खरीप कडधान्ये, सोयाबीन या पिकांना धोका निर्माण होतो की काय?अशी भीती व्यक्त होत आहे.