राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पितृशोक

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वडील विठोबा रामा भरणे यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले

इंदापूर: प्रगतशील शेतकरी व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वडील विठोबा रामा भरणे यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (दि.२९) निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.  काही दिवसांपासून ते आजारी होते.त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरु होते. उपचारादरम्यान रात्री सव्वाअकरा वाजता त्यांचे निधन झाले. उद्या (दि.३०) सकाळी अकरा वाजता भरणेवाडी या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यविधी होणार आहे.