भाजपाच्या सत्तेला पवारांचा सुरुंग; अधिकाऱ्यांमार्फत चालवितात पुणे महापालिकेचा कारभार

पुणे महापालिकेत भाजपाची सत्ता आहे, तब्बल 100 नगरसेवक भाजपाचे आहेत. पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांच्यासह शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदारही या बैठकीला उपस्थित होते. मात्र या बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना आमंत्रण देण्यात आले नाही. यामुळे पुणे महापालिकेत सत्ता जरी भाजपाची असली तरी अंतिम निर्णय राज्य सरकारकडे असतात.

    पुणे : पुणे महापालिकेच्या कारभारावरून भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. पुणे महापालिकेच्या विविध प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मंत्रालयात बैठक बोलाविली होती. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना या बैठकीचे निमंत्रणच देण्यात आले नव्हते. यावरून महापालिकेची सत्ता बळकावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आयुक्तांचा वापर करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. तर भाजपला कारभार करता येत नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. एकंदरीत, यावरून पुणे महापालिकेतील भाजपाच्या सत्तेला उपमुख्यमंत्री पवारांनी सुरुंग लावल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

    पुणे महापालिकेत भाजपाची सत्ता आहे, तब्बल 100 नगरसेवक भाजपाचे आहेत. पुणे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांच्यासह शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदारही या बैठकीला उपस्थित होते. मात्र या बैठकीला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना आमंत्रण देण्यात आले नाही. यामुळे पुणे महापालिकेत सत्ता जरी भाजपाची असली तरी अंतिम निर्णय राज्य सरकारकडे असतात.

    हे निर्णय घेताना पवार पूर्णपणे त्यांच्या अधिकारांचा वापर करतात, असे दिसून येत आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका काबीज करण्यासाठी पवार पूर्णपणे त्यांच्या सत्तेचा, अधिकाराचा उपयोग करताना दिसत आहेत, असे भाजपाचे म्हणणे आहे.