शेतकऱ्यांना पीककर्ज व्याज परतावा तत्काळ द्या; जिल्हा प्रमुख डॉ.राम गावडे यांची मागणी

पी.डी.सी.सी.बॅंकेच्या धोरणा प्रमाणे पत्रकानुसार ३० सप्टेंबर २०२१ पर्यंतच्या अखेर घेतलेल्या पीक कर्जाचा भरणा मुद्दल आणि ६ टक्के व्याजासह भरणा संबंधित शेतकरी यांनी केलेला आहे. शासनाच्या व बॅंकेच्या धोरणा प्रमाणे ३ लाख रुपयांपर्यंत शुन्य टक्के व्याजाने शेतखरयांना पीक कर्जाचा पुरवठा जातो. जे पात्र सभासद शेतकरी नियमित व मुदतीचे आत पीक कर्जाची परतफेड करतील अशा सर्व शेतकऱ्यांंना या योजनेचा लाभ मिळतो.

  आळंदी : राज्यातील विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभासदांना शेतकरी पीककर्ज व्याज परतावा अद्याप पर्यंत मिळाला नसून यापुढील काळात तात्काळ सोसायटीच्या सभासद शेतकरी यांना पी.डी.सी.सी.बॅंकेच्या धोरणा नुसार कर्जाचा भरणा केला असल्याने पीककर्ज व्याज परतावा तात्काळ देण्याची मागणी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक व माजी पुणे जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डॉ.राम गावडे यांनी केली आहे.

  पी.डी.सी.सी.बॅंकेच्या धोरणा प्रमाणे पत्रकानुसार ३० सप्टेंबर २०२१ पर्यंतच्या अखेर घेतलेल्या पीक कर्जाचा भरणा मुद्दल आणि ६ टक्के व्याजासह भरणा संबंधित शेतकरी यांनी केलेला आहे. शासनाच्या व बॅंकेच्या धोरणा प्रमाणे ३ लाख रुपयांपर्यंत शुन्य टक्के व्याजाने शेतखरयांना पीक कर्जाचा पुरवठा जातो. जे पात्र सभासद शेतकरी नियमित व मुदतीचे आत पीक कर्जाची परतफेड करतील अशा सर्व शेतकऱ्यांंना या योजनेचा लाभ मिळतो. यात केंद्र सरकारच्या ३ टक्के आणि राज्य शासनाच्या वतीने २ टक्के तसेच बॅंके तर्फे १ टक्का वाईज सवलत अशी ६ टक्के व्याज देण्याची विभागणी आहे. यापूर्वीचे धोरण प्रमाणे वेळेत पीक कर्ज परतफेड करताना फक्त मुद्दल भरावी लागत होती. आता मात्र नवीन धोरणानुसार ६ टक्के व्याजासह मुद्दल भरणा करावा लागत असल्याने शेतकरी वर्गात नाराजी आहे.

  शेतकरी वर्गात नाराजी

  पूर्वीच्या स्कीम प्रमाणे यापुढील काळात पुन्हा केवळ कर्ज मुद्दल भरून घेऊन शेतकरी बांधवाना दिलासा देण्याची मागणी गावडे यांनी केली आहे. केवळ कर्ज रक्कम भरून घेण्याचा निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. मुद्दल व्याज भरल्यानंतर डीबीटी व्याज परतावा मिळण्यास उशीर होत असल्याने व्याज भरायचे परत संबंधित खात्यात जमा करण्याचे यामुळे वित्त संस्थाना कामकाज देखील वाढत आहे. नाहक बँक कर्मचारी यांचेवर ताण देखील येत असल्याने धोरणात बदल करण्याची गरज आहे.

  धोरणात बदल करण्याची गरज

  विना व्याज कर्ज योजना असल्याने व्याज रक्कम भरणा करून न घेता केवळ मुद्दल भरून घेऊन योजेत सुलभता आणावी अशी मागणी गावडे यांनी केली आहे. व्याज भरून घेवून ते परत मिळविण्यास नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कर्ज व्याजासह भरण्यास देखील शेतकरी यांना धावपळ करावी लागते. व्याज भरल्या पासून परत टी रक्कम मिळे पर्यंतच्या कालावधीचे व्याज शासनाने देण्याची मागणी देखील डॉ. गावडे यांनी शेतक-यांचे वतीने केली आहे.