PDCC Bank election unopposed in Khed; Satkar and Butte's public support to MLA Dilip Mohite

खेड तालुक्यात पीडीसीसी बँक निवडणूकीला मोठा रंजक ईतिहास आहे. १९८५ ते २००४ ही २० वर्षे (नारायण) "आप्पा विरुद्ध आप्पा" (सातकर) हे दोन गट गावागावांत होते. स्वर्गीय माजी आमदार नारायण पवार यांनी दिवंगत माजी आमदार सहकारमहर्षी साहेबराव सातकर यांना आयुष्याच्या उतारवयात 'पीडीसीसी'त अस्मान दाखविले. दोन आप्पांच्या पाश्च्छत तालुक्यात 'अण्णा पर्व' सुरू झाले. त्यानंतरच्या निवडणुकीत (शेटे) "अण्णा विरुद्ध अण्णा" (सातकर) अशी जोरदार लढत झाली. त्यात स्वर्गीय बाळासाहेब शेटे यांनी आमदार दिलीप (अण्णा) मोहिते यांच्या सहकार्याने ४५ वर्षे संचालक असलेल्या आप्पसाहेब सातकर यांचे चिरंजीव हिरामण (अण्णा) सातकर यांना पराभूत केले(PDCC Bank election unopposed in Khed; Satkar and Butte's public support to MLA Dilip Mohite).

  राजगुरुनगर : खेड तालुक्यात पीडीसीसी बँक निवडणूकीला मोठा रंजक ईतिहास आहे. १९८५ ते २००४ ही २० वर्षे (नारायण) “आप्पा विरुद्ध आप्पा” (सातकर) हे दोन गट गावागावांत होते. स्वर्गीय माजी आमदार नारायण पवार यांनी दिवंगत माजी आमदार सहकारमहर्षी साहेबराव सातकर यांना आयुष्याच्या उतारवयात ‘पीडीसीसी’त अस्मान दाखविले. दोन आप्पांच्या पाश्च्छत तालुक्यात ‘अण्णा पर्व’ सुरू झाले. त्यानंतरच्या निवडणुकीत (शेटे) “अण्णा विरुद्ध अण्णा” (सातकर) अशी जोरदार लढत झाली. त्यात स्वर्गीय बाळासाहेब शेटे यांनी आमदार दिलीप (अण्णा) मोहिते यांच्या सहकार्याने ४५ वर्षे संचालक असलेल्या आप्पसाहेब सातकर यांचे चिरंजीव हिरामण (अण्णा) सातकर यांना पराभूत केले(PDCC Bank election unopposed in Khed; Satkar and Butte’s public support to MLA Dilip Mohite).

  त्यानंतरच्या निवडणुकीत पुन्हा मोहिते “अण्णा विरुद्ध अण्णा” (सातकर) असा थेट सामना झाला. त्यात दिलीपअण्णांनी हिरुअण्णांना मोठ्या फरकाने पराभूत केले. या ‘अण्णा पर्वात’ झालेल्या दोनही निवडणुकांत मोठी आर्थिक उलाढाल झाली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीकडे उत्तर पुणे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र वरिष्ठांनी लक्ष घालून दोनही अण्णांमध्ये समन्वय साधल्याने खेडमध्ये सातकर अण्णांनी  मोहिते अण्णांना पीडीसीसी बँकेत  ‘विनाशर्त(?)’ पाठिंबा जाहीर केला.

  राजगुरूनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पुरस्कृत सहकार पॅनेलच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी खेड तालुक्यातील सर्व सभासद मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता. यावेळी दोनही अण्णांनी मनोगतात जोरदार बॅटिंग केली.

  खेड तालुका हा शरद पवार साहेबांच्या विचारांना माननारा आहे. पवार साहेब व अजितदांदावर प्रेम करणारा हा तालुका आहे. बँकेच्या निवडणुकीत मला अडथळा नाही. तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांला न्याय देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. बँकेसाठी उमेदवारी अर्ज भरतानाच पालकमंत्री अजित पवार यांना शब्द दिल्याने त्यांच्या विचांराच्या बाहेर जायचे नाही, असे मी ठरवले आहे. जिल्हा बँक ही सर्वसामान्याची बँक आहे. बँकेच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची कामे केल्याचे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते यांनी यावेळी केले.

  हिरामण सातकर यांनी आपण शेवटच्या दिवशी म्हणजे उद्या बुधवारी (दि. २२) माघार घेणार असल्याचे यावेळी जाहीर केले. त्यांनी अ, ब आणि क गटांतून अर्ज दाखल करून आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला योग्य ती संधी अद्यापही न मिळाल्याचे सूचक व्यक्त त्यांनी यावेळी केले. त्यावरून त्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्षपदाचा शब्द दिल्याचा जाणकार अंदाज व्यक्त करीत आहेत.

  यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, बँकेचे मावळते अध्यक्ष रमेश थोरात, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, पंचायत समिती सभापती अरुण चौधरी व उपसभापती वैशाली गव्हाणे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विनायक घुमटकर, अरुण चांभारे, सुभाष होले, राजाराम लोखंडे, रामदास ठाकूर, अनिल राक्षे, बाळशेठ ठाकूर, सुरेश शिंदे, लक्ष्मण टोपे, वसंत भसे, मयूर मोहिते, राहुल नायकवडी, नवनाथ होले, हेमलता टाकळकर, कांचन ढमाले, आशा तांबे यांच्यासह जिल्हा बँकेचे सर्व उमेदवार व बँकेचे सर्व सोसायटी व ईतर मतदार प्रतिनिधी उपस्थित होते.

  बँकेच्या वाटचालीबाबत मावळते अध्यक्ष रमेश थोरात म्हणाले की बँकेच्या अकरा हजार ५०० कोटी रुपयांच्या ठेवी आठ हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज वाटप जिल्हा बँकेला २८२ कोटीचा रुपयांचा निव्वळ नफा झाला. आम्ही जिल्हा बँकेला शिस्त लावली. तुम्ही बँकेचे मालक आहात आम्ही चालक आहोत. शेतकऱ्यांसह ग्राहकांना सेवा देऊन पुणे जिल्हा बँकेने विश्वासार्हता जपली आहे. आज जिल्ह्यातील शेतकरी समाधानी आहेत.

  बँकेच्या निवडणुकीतील उमेदवार प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, निर्मला जागडे, पूजा बुट्टे, सुरेश घुले, संभाजी होळकर, प्रवीण शिंदे, दत्तात्रय येळे आदी उमेदवारांनी उपस्थितांना अभिवादन केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर यांनी केले. सुत्रसंचलन प्रवक्ते उमेश गाडे यांनी तर महिला तालुकाध्यक्षा संध्या जाधव यांनी आभार मानले.

  दरम्यान, मंगळवारी (दि. २१) भाजप उमेदवार शरद बुट्टे पाटील यांनी अर्ज मागे घेऊन आमदार दिलीप मोहिते यांना ‘बाय’ दिला. यावर आमदार मोहिते यांनी दिलखुलास प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की मी आता हळूहळू राजकीय निवृत्तीकडे वळत आहे. त्यामुळे व्यक्तीगत वाद ठेवायचे नाहीत असा निर्णय घेतला आहे. बुट्टे यांचेबरोबरचे वाद संपले आहेत. राजकीय मतभेद होते तरी बुट्टेंनी विकासात कधी अडथळा आणला नाही.

  मीही त्यांच्या विकासकामांना कधी विरोध केला नाही. बुट्टे अभ्यासू आहेत. त्यांनी शून्यातून राजकीय स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे राजकीय मतभेद असले तरी तालुक्याच्या भावी दृष्टीने चांगले नेतृत्व घडविणे माझे कर्तव्य आहे. राजकारणात कोणीही कायमचा शत्रू अथवा मित्र राहत नाही, अशी भूमिका मोहितेंनी मांडली.