घटस्फोटानंतर दुसऱ्या पत्नीचाही छळ; अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार

    पिंपरी : घरगुती किरकोळ कारणांवरून मारहाण करून विवाहितेचा छळ केला. तसेच बळजबरीने अनैसर्गिक कृत्य करून तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार तळेगाव – दाभाडे येथे २५ मे ते २२ जून २०२१ या कालावधीत घडला. यावरून महिलेने तळेगाव – दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पतीने पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला आहे, असे महिलेला सांगितले. त्यानंतर आळंदी येथे नेऊन त्याने महिलेसोबत लग्न केले. त्यानंतर महिलेचा छळ सुरू केला. स्वयंपाक येत नाही, घरात कचरा असतो, तसेच पगाराचे पैसे देत नाही, अशा घरगुती कारणावरून पत्नीला मारहाण करून शारीरिक व मानसिक त्रास दिला. पत्नी नको म्हणत असताना आरोपीने बळजबरीने अनैसर्गिक कृत्य केले.