पिंपरी पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत ‘एवढ्या’ तरुणींची केली सुटका; तर इतक्या लाखांचे ‘कंडोम्स’ केले जप्त

काळेवाडी भागात ग्रीन विलेज स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी चौघी तरुणींची सुटका केली. सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनीही कारवाई केली आहे.

  पिंपरी: पिंपरी- चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) काळेवाडी भागात सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाच्या रॅकेटची (sex racket )पोलिसांनी (Police) भांडाफोड करत चार तरुणींची सुटका केली आहे. यावेळी देह व्यापारास भाग पडणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनीही कारवाई केली आहे.

  काळेवाडी भागात ग्रीन विलेज स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी चौघी तरुणींची सुटका केली. तर स्पा चालक दीपक साळुंखे आणि अमित काटे या दोघा आरोपींना अटक केले आहे.

  यापूर्वीही पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने रात्री बार आणि लॉजवर छापेमारी केली होती. जगताप डेअरी परिसरातील अॅलो गॅस्ट्रो लॉज आणि एटीन डिग्री रुफ टॉप हॉटेल अँड बारवर पोलिसांनी धाड टाकली होती. यावेळी २००हून अधिक तरुण-तरुणींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतला होतं. कोरोनासंबंधी नियमांचे उल्लंघन करुन अॅलो गॅस्ट्रो लॉज आणि १८ डिग्री रुफ टॉप बार सुरु होते. दारु पिऊन आणि इतर मादक पदार्थांचं सेवन करुन तरुण-तरुणी विकेंड पार्टी साजरी करत होते. अॅलो गॅस्ट्रो लॉजमधून ११३, तर एटीन डिग्री रुफ टॉप हॉटेल अँड बारमधून १०५ तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

  मुंबईतील नालासोपाऱ्यातील सेक्स रॅकेटचाही पर्दाफाश

  दुसरीकडे, नालासोपाऱ्यात चाळीतील खोलीत चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत पोलिसांनी चार तरुणींनीची सुटका केली आहे. खोलीत तरुणींना डांबून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याचे समोर आले आहे. या कारवाई दरम्यान दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे.
  आरोपीमध्ये एक तृतीयोपंथीयाचा समावेश आहे.आरोपींकडून २ लाख ५३ हजार ४४० रुपयांचे निरोध (कंडोम्स) जपत करण्यात आले आहेत.