दरेकरवाडीत स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण

शिक्रापूर: दरेकरवाडी (ता. शिरूर) या आदर्श व निर्मल गावाकडे वाटचाल करणाऱ्या छोटाश्या गावामध्ये ग्रामपंचायतच्या वतीने महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले

शिक्रापूर: दरेकरवाडी (ता. शिरूर) या आदर्श व निर्मल गावाकडे वाटचाल करणाऱ्या छोटाश्या गावामध्ये ग्रामपंचायतच्या वतीने महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले असल्यामुळे आता दरेकरवाडी गाव हिरवेगार होणार आहे. दरेकरवाडी (ता. शिरूर) येथे ग्रामपंचायतच्या वतीने महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत स्मशानभूमी परिसरात वड, सिसम, पिंपळ, लिंब यांसह आदी देशी झाडांची लावगड करत वृक्षारोपण करण्यात आले आहे. यावेळी सरपंच प्रमिला दरेकर, उपसरपंच भाऊसाहेब चकोर, माजी उपसरपंच हिरामण दरेकर, संपदा दरेकर, पोलीस पाटील पांडूरंग दरेकर, ग्रामविकास अधिकारी विकास विसे, उद्योजक विक्रम पानसरे, पांडुरंग दरेकर यांसह आदी उपस्थित होते, यावेळी बोलताना गावामध्ये स्मशानभूमी व आदि परिसरामध्ये लावण्यात आलेल्या झाडांचे जतन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे माजी उपसरपंच हिरामण दरेकर यांनी सांगितले.