पीएमपी पुढील वर्षात १५० ई-बस घेणार भाडेतत्वावर

पुणे : पीएमपी ( पुणे महानगर परीवहन महामंडळ ) पुढील वर्षभरात सुमारे दिडशे ई बसेस भाडेतत्वावर घेणार आहे. सध्या भाडेतत्वावरील ई बसेसच्या तुलनेत या बसेसचा प्रति किलाेमीटरचा दर जास्त आहे. खासदार गिरीष बापट आणि पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी पत्रकार परीषदेत याची माहिती दिली.

पुणे : पीएमपी ( पुणे महानगर परीवहन महामंडळ ) पुढील वर्षभरात सुमारे दिडशे ई बसेस भाडेतत्वावर घेणार आहे. सध्या भाडेतत्वावरील ई बसेसच्या तुलनेत या बसेसचा प्रति किलाेमीटरचा दर जास्त आहे.
खासदार गिरीष बापट आणि पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी पत्रकार परीषदेत याची माहिती दिली. यावेळी महापाैर मुरलीधर माेहाेळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, पीएमपीचे संचालक सदस्य आणि नगरसेवक शंकर पवार यावेळी उपस्थित हाेते. इलेक्ट्रीक आणि हायब्रीड वाहन तंत्रज्ञानाच्या निर्मितीस प्रोत्साहन देणे आणि तिची शाश्वत वाढ सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाकडून फेम-२ ही योजना सुरू केली आहे. याेजनेतंर्गत ६०० इलेक्‍ट्रिक बसेस पीएमपीला मिळाव्यात यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला गेला हाेता. त्यापैकी दिडशे बसेस घेण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने तत्वत: मान्यता दिली आहे. यामध्ये प्रत्येक बसला ५५ लाख रुपये सबसिडी केंद्र सरकारकडून मिळणार आहे.

याबाबतची निविदा प्रक्रीया नुकतीच राबविण्यात आली हाेती. पहील्या निविदा प्रक्रीयेत किफायतशीर दर न आल्याने फेरनिविदा काढण्यात आली. या फेरनिविदेत ईव्हीईवाय ट्रान्स प्रा. लि. यांची निविदा पात्र झाली आणि त्यांच्याशी चर्चा करून प्रति किलाेमीटर ६३ रुपये ९५ पैसे प्रति किलाेमीटर दराने ई बस घेण्यात येणार आहे. त्यास संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. सदर कंपनीला १५० ई-बसेसची वर्कऑर्डर देण्यात आली आहे. एपि्रल महिन्यापासून या बसेस पीएमपीला मिळण्यास सुरवात हाेईल. डिसेंबर अखेर दिडशे बसेस पीएमपीच्या ताफ्यात दाखल हाेतील असा दावा बापट आणि जगताप यांनी केला.

भाडेतत्वावरील बसेस घेण्याएैवजी पीएमपी बस खरेदी का करीत नाही असा प्रश्न विचारला असता, जगताप यांनी पीएमपी सध्या ताेट्यात असून, बसखरेदीसाठी तेवढे भांडवल गुंतविणे शक्य नसल्याचे नमूद केले. सध्या ई बसेस भाडेतत्वावर घेण्यात आल्या असून, त्यांचा प्रति किलाेमीटरचा दर हा साधारण ५८ रुपये ५० पैसे इतका आहे. प्रति युनिट वीज दर सात रुपये इतका असून, नव्याने भाडेतत्वावर घेण्यात येणाऱ्या बसेसचा प्रति किलाेमीटरचा दर जास्त असल्याकडे लक्ष वेधले असता, जगताप यांनी यापुर्वीच्या ई बसेस या फेब्रुवारी २०१९ साली करार करून पीएमपीच्या ताफ्यात आल्या हाेत्या. तेव्हांचा दर आणि आत्ताचा दर यात विविध कारणांमुुळे फरक पडल्याचा दावा ही केला.

शहराच्या पेठांच्या भागांत दहा रुपयात दिवसभर फिरा
यापत्रकार परीषदेत स्थायी समितीचे अध्यक्ष रासने यांनी पुणे महापािलका २५ काेटी रुपये खर्च करून ५० ते ६०मिडी बसेस खरेदी करणार अाहे. या बसेस ९ मीटर लांबीच्या असुन, यामध्ये साधारण २६ ते २८ प्रवासी बसु शकतात. तर दहा ते पंधरा प्रवासी उभे राहु शकतात. याबसेसच्या माध्यमातून शहराच्या मध्यवर्ती भागांत पीएमपीची सेवा केवळ दहा रुपयांत उपलब्ध करून दिली जाणार आहे. दहा रुपयांचे तिकीट काढल्यानंतर प्रवासी या पेठांच्या भांगात दिवसभर पीएमपीमधून प्रवास करू शकणार आहे. ही याेजना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

आकड्यांचे बाेल
* नवीन करारानुसार घेण्यात येणाऱ्या दिडशे बसमधील प्रत्येक बसही प्रतिदन २२५ किमी धावेल
* दिडशे पैकी ९० बसेस या पुणे महापालिकेच्या हद्दीत तर ६० बसेस या िपंपरी िचंचवड महापािलकेच्या हद्दीतील मार्गावर धावतील
* यापुर्वी २०१८-१९ मध्ये १५० ई बसेस भाडेतत्वावर घेतल्या गेल्या. यावर्षीखेर आणखी िदडशे बसेस ताफ्यात अाल्यानंतर ई बसेसची संख्या ३०० हाेणार
* १२ मीटर लांबीच्या बीआरटी ३५० ई-बसेस भाड्याने घेण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात