pooja chavhan

गेले अनेक महिने शांत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात फॉरेन्सिक अहवाल समोर आल्यानंतर उचल खाल्ली असून यामुळे शिवसेना आमदार व माजी मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीतही वाढ झाली आहे. फॉरेन्सिक अहवालापाठोपाठ पोलिसांना व्हिसेरा अहवालही प्राप्त झाला असून या अहवालात आत्महत्येपूर्वी पूजाने मद्य प्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे. दारूच्या नशेतच तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्राने दिली आहे.

    पुणे : गेले अनेक महिने शांत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात फॉरेन्सिक अहवाल समोर आल्यानंतर उचल खाल्ली असून यामुळे शिवसेना आमदार व माजी मंत्री संजय राठोड यांच्या अडचणीतही वाढ झाली आहे. फॉरेन्सिक अहवालापाठोपाठ पोलिसांना व्हिसेरा अहवालही प्राप्त झाला असून या अहवालात आत्महत्येपूर्वी पूजाने मद्य प्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे. दारूच्या नशेतच तिने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्राने दिली आहे.

    पूजाच्या वैद्यकीय अहवालामध्ये तिच्या मानेला मार लागला होता. तर तिच्या शरीरामध्ये अल्कोहोल असल्याची धक्कादायक बाब केमिकल अॅनालायसेस अहवालातही नोंद करण्यात आली होती, त्यास या अहवालामुळे पुष्टी मिळाली आहे. आत्महत्येआधी पूजा आणि राठोड यांच्यात 90 मिनिटे फोनवर बोलणे झाल्याचे समोर आले आहे. हे संभाषण बंजारा भाषेत होते. टिकटॉक स्टार पूजाने 7 फेब्रुवारी 2021 रोजी पुणे येथे एका इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती.

    या प्रकरणात राठोड यांची चौकशी झाली आहे. मात्र त्यांचा सहकारी अरूण राठोड याने सगळा दोष स्वतःवर घेतला आहे. रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांनी सांगितले आहे की पूजा आणि अरूण राठोड गर्भपात करण्यासाठी रूग्णालयात आले होते. गर्भपात झाल्यानंतर पूजासंदर्भातली सगळी कागदपत्रे रूग्णालयाने अरूण राठोडला दिली होती. पोलिसही याबाबत ठोस अशी माहिती देत नसल्याने हे प्रकरण दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न होत असल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.