खोकल्याचे औषध समजून विषारी औषध केले प्राशन; पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

खोकल्याचे औषध समजून तणनाशक असलेले टू फोर डी हे औषध प्राशन केले. त्यांना त्यामुळे त्रास सुरु झाला.

    बारामती. खोकल्याचे औषध समजून विषारी औषध प्राशन केल्याने बारामती तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
    पोपट दराडे(रा.अकोले,ता.इंदापूर)असे मृत्यू झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

    दराडे हे बारामती ग्रामीण पोलिस ठाण्यात नेमणुकीस होते. त्यांना दोन ते तीन दिवसांपासून खोकल्याचा त्रास होत होता,ते कामावरून अकोले येथील त्यांच्या घरी आले होते, त्यावेळी त्यांनी खोकल्याचे औषध समजून तणनाशक असलेले टू फोर डी हे औषध प्राशन केले. त्यांना त्यामुळे त्रास सुरु झाला. उपचाादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान याबाबत पोलिस अधिक तपास करत आहेत. दराडे यांच्या मृत्यूने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.