teleicu in akola

कोरोना विषाणुच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पिंपरी - चिंचवड महापालिकेच्यावतीने आकुर्डी येथील प्रभाकर कुटे मेमोरीयल रूग्णालयामध्ये १४ आयसीयु तर थेरगाव रूग्णालयात २८ आयसीयू तयार करण्यात आले आहेत.

    पिंपरी – महापालिकेच्यावतीने आकुर्डी येथील प्रभाकर कुटे मेमोरीयल रूग्णालयात १४ आयसीयू तर थेरगाव रूग्णालयात २८ आयसीयू तयार करण्यात आले आहेत. या दोन्ही रूग्णालयातील आयसीयू बेडसाठी तीन पॅकेजमध्ये मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे. या कामाकरिता एका पॅकेजसाठी ६२ लाख ७२ हजार रूपये असा एकूण १ कोटी २५ लाख ४४ हजार रूपये खर्च येणार आहे. तीन महिन्यांसाठी हा खर्च होणार आहे. स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. नितीन लांडगे होते. सभेत सुमारे २६ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली.

    कोरोना विषाणुच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पिंपरी – चिंचवड महापालिकेच्यावतीने आकुर्डी येथील प्रभाकर कुटे मेमोरीयल रूग्णालयामध्ये १४ आयसीयु तर थेरगाव रूग्णालयात २८ आयसीयू तयार करण्यात आले आहेत. सीसीसी, आयसीयु आणि ऑक्सिजन युक्त बेडसाठी मनुष्यबळ पुरविण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये प्राप्त निविदाधारकांचे एम्पॅनेलमेंट केले होते. आयसीयुसाठी १०, १५ आणि ५० बेडसाठी दर मागविण्यात आले होते. यामध्ये आयकॉन हॉस्पीटलचे १५ बेडसाठी ४ हजार ९७८ रूपये प्रतिबेड प्रति दिन असे दर प्राप्त झाले आहेत. यासाठी एम्पॅनेलमेंट तयार करण्याकरिता स्थायी समिती सभेने १ सप्टेंबर २०२१ रोजी मान्यता दिली.

    त्यानुसार, आकुर्डीतील प्रभाकर कुटे मेमोरीयल रूग्णालयामधील १५ बेडसच्या पॅकेजच्या दराने १४ आयसीयु बेडच्या एका पॅकेजकरिता काम सुरू करण्यासाठी डॉ. जे. के. व्हेनचर्स यांना आदेश देण्यात आले आहेत. या आयसीयु पॅकेजसाठी ६२ लाख ७२ हजार रूपये इतका खर्च येणार आहे. थेरगाव रूग्णालयातील १५ बेडसच्या पॅकेजच्या दराने १४ आयसीयु बेडसच्या दोन पॅकेजकरिता काम सुरू करण्यासाठी आयकॉन हॉस्पीटल यांना आदेश देण्यात आले आहेत. या आयसीयू च्या पहिल्या पॅकेजसाठी ६२ लाख ७२ हजार रूपये आणि दुसऱ्या पॅकेजसाठी ६२ लाख ७२ हजार रूपये असा एकूण १ कोटी २५ लाख ४४ हजार रूपये खर्च येणार आहे. या कामाचा कालावधी सप्टेंबर २०२१ ते डिसेंबर २०२१ पर्यंत राहणार आहे.