जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी प्रा.दिंगबर दुर्गाडे तर उपाध्यक्षपदी सुनील चांदोरे बिनविरोध; रमेश थोरात समर्थकांना धक्का

पुणे जिल्हा बँक सहकारी बँकेच्या (Pune District Central Cooperative Bank) अध्यक्षपदी प्रा. दिगंबर दुर्गाडे (Prof. Digambar Durgade) यांची तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे (Sunil Chandere) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

    पाटस : पुणे जिल्हा बँक सहकारी बँकेच्या (Pune District Central Cooperative Bank) अध्यक्षपदी प्रा. दिगंबर दुर्गाडे (Prof. Digambar Durgade) यांची तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे (Sunil Chandore) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि.15) झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
    दौंड तालुक्याला विशेषतः रमेश थोरात समर्थकांना या निवडीचा धक्का मानला जात आहे. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात हे सलग सात वर्ष जिल्हा बँकेवर अध्यक्ष होते. आता या निवडणुकीत ही त्यांची बिनविरोध संचालकपदी निवड झाली होती. रमेश थोरात यांना पुन्हा एकदा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी संधी मिळेल, अशी अपेक्षा थोरात समर्थकांना होती. मात्र, या दोन्ही पदांसाठी पवार आणि वळसे यांच्या मर्जीतील संचालकाची निवड झाल्याची चर्चा या निवडीवरून होत आहे.
    जिल्हा बॅंकेच्या 21 संचालकांची निवडणूक नुकतीच झाली. काहीजण बिनविरोध निवडून आले तर काहींनी दिग्गजांना पराभूत केले. या बॅंकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहिले आहे. शनिवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदी प्रा.दिंगबर दुर्गाडे आणि उपाध्यक्ष सुनील चांदोरे यांची बिनविरोध निवड करण्याचे ठरले.