मोशीत ‘स्पा’ सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांनी केली कारवाई

क्रिस्टल स्पा या सेंटरमध्ये मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून आरोपींना अटक केली. भोसरी, एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

    पिंपरी: स्पा सेंटरच्या नावाखाली मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करत पोलिसांनी दोघांना अटक केली. ही कारवाई मोशीतील क्रिस्टल स्पा सेंटरवर बुधवारी करण्यात आली.  अशोक गोविंद सपकाळ (वय – ६०, रा. दिघी), राजपाल श्रीलालसिंग यादव (वय – ३९, सिध्दीविनायक नगरी, अप्पूघराजवळ, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. तर दिपाली पंकज तेली (वय – ३७, रा. मोशी) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुबराव भिमराव गवारे यांनी एमआयडीसी, भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोशीतील क्रिस्टल स्पा या सेंटरमध्ये मुलींकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून आरोपींना अटक केली. भोसरी, एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.