अभिमानास्पद ! जगातील शंभर प्रेरणादायी व्यक्तींमध्ये ‘माहेर’च्या लुसि कुरियन बाराव्या स्थानावर

शिक्रापूर : वढू बुद्रुक ता. शिरूर येथे अनाथ मुले व महिलांसाठी कार्य करणाऱ्या माहेर संस्थेच्या संस्थापिका व समाजसेविका लुसि कुरियन यांचा जगातील शंभर सर्वाधिक प्रेरणादायी व्यक्तींच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. प्रेरणादायी व्यक्तींमध्ये कुरियन यांचा बाराव्या क्रमांकावर स्थान आले असल्याने माहेर संस्थेतील अनाथांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वढू बुद्रुक ता. शिरूर येथील माहेर संस्थेच्या संस्थापिका असलेल्या लुसि कुरियन उर्फ दीदी यांना व माहेर संस्थेला आज पर्यंत आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, देश, राज्य पातळीवर १०० पेक्षा अधिक पुरस्कार प्राप्त झालेले आहे. जगातील प्रेरणादायी व्यक्तींच्या यादीमध्ये अंतराळवीर, शास्त्रज्ञ, लेखक, कवी, नायक, डिझायनर, इतिहासतज्ञ, बाल हक्कांसाठी कार्यरत असणारी मलाला युसूफझाई, कुलपती माइक्रोसॉफ्टचा सीइओ, तत्वज्ञ, सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश असतो. यामध्ये माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसि कुरियन उर्फ दीदी यांचा सध्याच्या यादीमध्ये १२ व्या क्रमांकावर नंबर लागला आहे. जगातील अंतरराष्ट्रीय जुरीनी जनमताच्या आधारे हि यादी प्रसिद्ध केली आहे. तर लुसि कुरियन यांची समाजाप्रती असलेली भावना तसेच तर प्रत्यक्ष कृती, समाजातील रंजल्या गांजलेल्यांना आधार देऊन त्यांचे नव्याने आयुष्य फुलवणे, पुनर्वसन असो कि शेवट पर्यंत सांभाळणे असो तसेच त्यांना हि जीवन जगण्याचा हक्क ,अधिकार व उत्तमातील उत्तम सुविधा देणे हे आपले कर्तव्य आहे असे लुसि दीदींचे कायम सर्वाना सांगणे आहे. तर लुसि कुरियन यांचा जगातील शंभर सर्वाधिक प्रेरणादायी व्यक्तींच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला असल्याने माहेर संस्थेतील सर्व अनाथ मुले, कर्मचारी व महिलांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.