भिल्ल,आदिवासी समुदायातील नागरिकांना अत्यावश्यक शासकीय दाखले द्या

– राणी कर्डीले यांची मागणी 

कवठे येमाई :शिरूर रामलिंगसह तालुक्यातील  भिल्ल,आदिवासी समुदायातील दुर्लक्षित असलेल्या नागरिकांना  रेशनकार्ड,आधारकार्ड ,जातीचे दाखले व इतर अत्यावश्यक शासकीय उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी रामलिंग महिला उन्नती संस्थेच्या वतीने संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी शिरूरचे नायब तहसिलदार श्रीशैलेश व्हट्टे यांना निवेदन देत केली आहे.

जुने शिरूर येथील रामलिंग महिला उन्नती संस्था ही तळागाळातील,वंचीत घटकांसाठी नेहमी कार्य करत असते .भिल्ल समाज यांचा निरक्षरतेमुळे त्यांचाकडे कोणतेही सरकारी कागदपत्र उपलब्ध झालेले नाहीत, हे सर्व लोक रामलिंग व परिसरात  वर्षांनूवर्षे कामधंद्याच्या निमित्ताने वास्तव्यास असल्या कारणाने त्यांना रेशन कार्ड,आधार कार्ड,जातीचे दाखला देणेबाबत आपल्या कार्यालयाचावतीने सहकार्य व मागदर्शन व्हावे. या गरीब समाजातील अनेक जण अशिक्षित असल्याने  व त्यांच्यातील अनेकांकडे पुरावा म्हणून कुठलीही शासकीय कागदपत्रे नसल्यामुळे त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही तसेच अजूनही ही हे लोक झोपडी मध्ये रहातात,त्यांना स्वतः ची जागा देखील रहायला नाही. या सर्व कुटुंबांचा सर्व्हे करून गरजू कुटुंबाना तात्काळ हक्काची शासकीय घरे जागेसह मिळण्याची देखील नितांत गरज आहे. यासंदर्भातील ठराव शिरूर ग्रामीण रामलिंग ग्रापंचायतने  शिरूर तहसीलदारांना दिलेला आहे.यावेळी संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले,ग्रामसेवक भाऊसाहेब जगदाळे ,उपसरपंच आरती चव्हाण उपस्थित होते.