Pune Airport Quarantine; Flights will be closed for 14 days

लोहगाव विमानतळावर सुखोई -30 MKI या लढाऊ विमानाचा उड्डाण भरत असताना अचानक टायर फुटला. त्यामुळे इतर उड्डाणावर मोठा परिणाम झाला. तात्काळ प्रशासनाने विमानसेवा बंद केली होती.

    पुणे – पुणे विमानतळावर एका लढाऊ विमानाचा अचानक टायर फुटल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे काही वेळ धावपट्टी ठप्प झाली होती. खराब धावपट्टीमुळे ही घटना घडली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले असून युद्धपातळीवर दुरूस्ती करून धावपट्टी सुरू करण्यात आली आहे. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.

    लोहगाव विमानतळावर सुखोई -30 MKI या लढाऊ विमानाचा उड्डाण भरत असताना अचानक टायर फुटला. त्यामुळे इतर उड्डाणावर मोठा परिणाम झाला. तात्काळ प्रशासनाने विमानसेवा बंद केली होती. विमानतळावर दररोज 70 ते 80 विमान उड्डाणांचे शेड्यूल ठरलेले असतात. विमानसेवा प्रभावित झाल्याने प्रवाशांना मनस्ताप झाला. धावपट्टी खराब असल्याने ही घटना घडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. आयएएफ च्या कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत साफसफाई करून विमानसेवा पूर्ववत केली.