पुणे: कांद्याच्या दरात मोठी घसरण; किरकोळ बाजारातही कांदा स्वस्त होणार

कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आवक वाढल्याने कांद्याचे दर गडगडले आहेत. यामुळे किरकोळ बाजारातही कांदा स्वस्त होण्याची शक्यता आहे(Pune: Big fall in onion prices; Onions will also be cheaper in the retail market ). 

    पुणे : कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आवक वाढल्याने कांद्याचे दर गडगडले आहेत. यामुळे किरकोळ बाजारातही कांदा स्वस्त होण्याची शक्यता आहे(Pune: Big fall in onion prices; Onions will also be cheaper in the retail market ).

    कांद्याच्या भावात मागील चार दिवसात 839 रूपये तर वीस दिवसात तब्बल 1900 रूपये प्रतिक्विंटलची प्रचंड घसरण झाली आहे. लोणंद बाजार समितीत 8 नोव्हेंबरला कांद्याचे दर प्रतिक्विंटल 3650 रूपये होते. तर सोमवारच्या लिलावात चांगल्या प्रतिच्या कांद्याला अवघा 1751 रूपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रतिचा कांदा तर अक्षरशः मातीमोल झाला आहे.

    कांद्याच्या या दरांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. आस्मानी, सुलतानी संकटांतून ज्या शेतकऱ्यांनी कांदा जगविला त्यांना किमान तीन हजार रूपये भाव मिळेल अशी आशा होती. परंतु नाशिक, नगर जिल्ह्यासह गुजराथ, राजस्थान, मध्यप्रदेशात कांद्याचे चांगले उत्पादन निघून आवक वाढू लागल्याने दर कोसळले आहेत.