पुणे शहरात गेल्या २४ तासांत १३६ नवीन काेराेनाबाधित

सध्या शहरात २ हजार ४७० काेराेनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यापैकी ३५९ रुग्णांची प्रकृती गंभीर असुन, ५०३ रुग्णांना अाॅक्सिजन पुरवठा केला जात आहे. आजपर्यंत शहरात एकुण ४ लाख ७५ हजार ९९० जणांना काेराेनाची लागण झाली हाेती, त्यापैकी ४ लाख ६४ हजार ९८३ जणांनी काेराेनावर मात केली आहे. तर ८ हजार ५३७ जणांचा बळी गेला आहे.

    पुणे : शहरात गेल्या चाेवीस तासांत १३६ नवीन काेराेना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर शहरातील सहा जणांसह सतरा जणांचा मृत्यू झाला आहे.शहरातील काेराेनाची दुसरी लाट ओसरत असून , गेल्या चाेवीस तासांत ३ हजार ८७२ जणांची चाचणी केली गेली. यात १३६ जण बाधित आढळून आले. तर गेल्या चाेवीस तासांत २२३ जण काेराेनामुक्त झाले आहे. सध्या शहरात २ हजार ४७० काेराेनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यापैकी ३५९ रुग्णांची प्रकृती गंभीर असुन, ५०३ रुग्णांना अाॅक्सिजन पुरवठा केला जात आहे. आजपर्यंत शहरात एकुण ४ लाख ७५ हजार ९९० जणांना काेराेनाची लागण झाली हाेती, त्यापैकी ४ लाख ६४ हजार ९८३ जणांनी काेराेनावर मात केली आहे. तर ८ हजार ५३७ जणांचा बळी गेला आहे.