पुणे महापालिकेची प्रॉपर्टी ‘सिटी लायब्ररी’ बनलीय मद्यपींचा ; सुरक्षारक्षकांच्या रोज होतात पार्ट्या

महापालिकेच्या मालकीच्या या जागी दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचीही दृश्य बघायला मिळत आहेत. याचाच अर्थ कुणाचाही वचक इथल्या धुंद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राहिलेला नाहीये. हा व्हिडिओ बाहेर आलाय म्हणून, नाहीतर या दारू पार्ट्या पुणे प्रशासनाला अंधारात ठेवून अशाच सुरू राहिल्या असत्या.

    पुणे: पुण्यात घोले रस्त्यावर महापालिकेचे मामाराव दाते मुद्रणालयात सर्हासपणे दारूच्या पार्ट्या झोडल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झालाय. सुरक्षा रक्षक मध्यरात्री तीन ते चार वाजेपर्यंत मद्याच्या पार्ट्या करतात. पार्ट्या करण्यासाठी सुरक्षा विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा सामील असल्याचा आरोप करण्यात आलाय.

    मामाराव दाते मुद्रणालयात दारूची पार्टी करतानाचा व्हिडिओ पुणे महापालिका प्रशासनाची झोप उडवणारा ठरलाय. विशेष म्हणजे हे मुद्रणालय महापौर बंगल्याजवळच आहे. महापालिकेच्या मालकीच्या या जागी दारूच्या बाटल्यांचा खच पडल्याचीही दृश्य बघायला मिळत आहेत. याचाच अर्थ कुणाचाही वचक इथल्या धुंद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राहिलेला नाहीये. हा व्हिडिओ बाहेर आलाय म्हणून, नाहीतर या दारू पार्ट्या पुणे प्रशासनाला अंधारात ठेवून अशाच सुरू राहिल्या असत्या.

    घोले रोडवर मामाराव दाते मुद्रणालय आहे. तिथे पुणे महापालिकेनं जुलै महिन्यात दुरुस्ती काम सुरू केले. या मुद्रणालयाचा पूर्णविकास करण्यात येणार आहे. त्याला ‘सिटी लायब्ररी’ असं नाव देण्यात आलेय. ही राज्यातली सर्वात मोठी लायब्ररी असेल. पण आता दारू पार्ट्यांच्या नावे या जागेची चर्चा होतेय. पुणे प्रशासन त्यांच्याच मुजोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या दारू पार्टीची काय भरपाई करायला लावेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.