रक्षकच बनला भक्षक ! पुण्यात पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

उपनिरीक्षक प्रवीण हे गेल्या तीन वर्षांपासून पुणे पोलीस दलात असून, त्यांची नेमणूक कोथरूड पोलीस ठाण्यात नेमणूक असताना पीडित तरुणीची ओळख झाली होती. ओळख झाल्यानंतर तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान प्रवीण यांचे लग्न झालेले आहे.

    पुणे : पुणे पोलिस दलातील पोलीस अधिकाऱ्याने तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ओळख झाल्यानंतर या तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखविले होते.उपनिरीक्षक प्रवीण जर्दे असे या अधिकाऱ्याचे नाव असून, याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक प्रवीण हे गेल्या तीन वर्षांपासून पुणे पोलीस दलात असून, त्यांची नेमणूक कोथरूड पोलीस ठाण्यात नेमणूक असताना पीडित तरुणीची ओळख झाली होती. ओळख झाल्यानंतर तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान प्रवीण यांचे लग्न झालेले आहे.