फॅशन स्ट्रीटच्या आगीने पुणे हादरले ; पाचशेहून अधिक दुकाने जाळून खाक ,कोट्यावधीचे नुकसान

आगीची तीव्रता एवढ़ी भयानक होती, की पिंपरी चिंचवडच्याही फायर ब्रिगेड गाड्यांना आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. साधारण मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाला यश आले होते. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत याठिकाणी कुलिंगचे काम सुरू होते.

    पुणे: पुण्यात खरेदीसाठी प्रसिद्ध कॅम्प परिसरात शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या फॅशन स्ट्रीटमधील दुकांनाना रात्री पावणे आकाराच्या आग लागल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तब्बल दोन तास सुरू राहिलेल्या या आगीने ५०० हून अधिक दुकाने जाळून खाक झाली आहेत.  आगीच्या घटनांची माहिती मिळताच अग्निशमन दल त्याठिकाणी पोहोचले अग्निशमन दलाने तब्बल १६ बंबाचा वापरून दोन तासात ही आग आटोक्यात आणली. आगीची तीव्रता एवढ़ी भयानक होती, की पिंपरी चिंचवडच्याही फायर ब्रिगेड गाड्यांना आग विझवण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. साधारण मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाला यश आले होते. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत याठिकाणी कुलिंगचे काम सुरू होते.

    अग्निशामक दलाला साधारण रात्री १० वाजून ५८ फॅशन स्ट्रीटवर आग लागल्याचा फोन मिनिटांनी आला होता. या दुर्घटनेत अद्यापपर्यंत तरी कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. मात्र खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या कँम्प परीसरातील छोटी-मोठी तब्बल पाचशेहून जास्त दुकाने जळून खाक झाली आहेत. त्यात छोट्यामोठ्या व्यापाऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे.

    लोकवस्तीतील धोका टाळला
    फॅशन स्ट्रीटला लागलेल्या आगीची दाहकता जवळच असलेल्या दाट आणि कोंदट लोकवस्तीपर्यंत न पोहचल्याने मोठा अनर्थ टळला आहे. परंतु फॅशन स्ट्रीटवरील कित्येक दुकानदारांचा कोट्यावधी रुपयांचा माल आगीत जळून खाक झाला आहे.