प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

पीडित तरुणी ही तिच्या मैत्रिणी सोबत एका मित्राच्या वाढदिवसाला वारजे माळवाडी येथे गेली होती. तेव्हा वाढदिवस झाल्यानंतर तिला एका खोलीत नेऊन तिच्यावर तिघांनी बलात्कार केला. त्यानंतर ती तेथून निघाली. त्यानंतरही या नराधमांनी या तरुणीचा पाठलाग केला.

    पुण्यातील सहकार नगर भागात राहणाऱ्या १४ वर्षाच्या मुलीला वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावून सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर आरोपीने तिच्या छातीवर गोळी झाडली. मात्र छातीत मोबाईल ठेवल्याने यातून ती बचावली असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. तर या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    हडपसर येथे राहणाऱ्या २४ वर्षीय कृष्णा ऊर्फ रोहन ओव्हाळ, वारजे माळवाडीतील २० वर्षीय निरंजन ऊर्फ निलेश शिंदे या दोघांना या प्रकरणात अटक करण्यात आली असून आणखी तिघांचा शोध सुरू आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही तिच्या मैत्रिणी सोबत एका मित्राच्या वाढदिवसाला वारजे माळवाडी येथे गेली होती. तेव्हा वाढदिवस झाल्यानंतर तिला एका खोलीत नेऊन तिच्यावर तिघांनी बलात्कार केला. त्यानंतर ती तेथून निघाली. त्यानंतरही या नराधमांनी या तरुणीचा पाठलाग केला. ही तरुणी रस्त्यावरुन जात असताना तीन आरोपींपैकी एकाने तिला रस्त्यात गाठलं आणि आणखी दोघे जण येणार आहेत. तू थांब नाही तर तुला मारून टाकेल, याबद्दल कोणाला सांगायचं नाही, असा दम दिला.

    पीडित तरुणीने तिथे थांबण्यास नकार दिला. त्यानंतर एका आरोपीने पोटमाळ्यावर असलेली पिस्तूल काढली आणि तिच्या छातीवर गोळी झाडली. पण पीडित तरुणीने मोबाईल छातीजवळ ठेवल्याने तिचा जीव वाचला. तिला थोडी दुखापत झाली. तिला आणि तिच्या मैत्रिणीला कात्रज येथे सोडून देण्यात आले. तेथील एका रुग्णालयात उपचार करून ती तरुणी घरी गेली. त्यानंतर या प्रकरणी दोघांना अटक केली असून आणखी तिघांचा शोध सुरू असल्याचे सहकारनगर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.