दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबेगाव येथील चंद्रभागा चौकात गोळीबाराचा थरार घडला आहे. समीर हा चौकात उभारला होता. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर अगदी जवळून गोळीबार केला.

    पुणे : शहरात गंभीर गुन्ह्यांचा खेळ रोजच सुरू असून, पुण्यात गोळीबार करून एका तरुणाची भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. त्याला ६ गोळ्या घालण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.समीर उर्फ़ सम्या मणुर (वय ४० , रा. आंबेगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबेगाव येथील चंद्रभागा चौकात गोळीबाराचा थरार घडला आहे. समीर हा चौकात उभारला होता. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर अगदी जवळून गोळीबार केला. यात त्याला ६ गोळ्या लागल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. दरम्यान शहरात भरदुपारी गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.