पुणेकरांनो सावधान! संकट अजून टळले नाही ; कोरोना रुग्णसंख्येत सलग दुसऱ्या दिवशी वाढ , दिवसभरात नवीन ३३३ रुग्ण

आजपर्यंत एकुण ४ लाख ७६ हजार ८२६ जणांना काेराेनाची लागण झाली हाेती, त्यापैकी ४ लाख ६५ हजार ७५६ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. तर आजपर्यंत एकुण ८ हजार ५५४ जणांचा बळी गेला आहे.

    पुणे : निर्बंध शिथिल केल्यानंतर काेराेनाच्या रुग्णसंख्येत सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. काेराेनाबाधित नवीन ३३३ रुग्ण आढळून आले आहे. तर १८७ रुग्ण हे काेराेनामुक्त झाले आहे. तर शहरातील पाच जणांसह १३ जणांचा मृत्यू झाला आहे.

    गेल्या चाेवीस तासांत ५ हजार ६९६ संशयित रुग्णांची चाचणी केली गेली. यामध्ये ३३३ रुग्ण काेराेना बाधित आढळून आले आहे. सलग दुसऱ्या दिवशी काेराेनामुक्त हाेणाऱ्यांच्या तुलनेत काेराेनामुक्त हाेणाऱ्यांची संख्या कमी आढळून आली आहे. यामुळे पुणेकरांनी सावध हाेण्याची वेळ आली आहे. शहरातील काेराेना नियंत्रणात आणण्यासाठी लागू केलेले निर्बंध हे शिथील केले गेले आहेत. गेल्या पंधरा दिवसापासून हे निर्बंध शिथिल झाले असले तरी सध्या काेराेना मुक्त हाेणाऱ्यापेक्षा काेराेनाबाधित नवीन रुग्णांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी अधिक आढळून आली आहे.

    सध्या शहरांतील सक्रीय रुग्णसंख्या ही पुन्हा अडीच हजाराच्या पुढे गेली आहे. सध्या विविध रुग्णालयांत २ हजार ५१६ जणांवर उपचार सुरू आहे. त्यापैकी ३२३ रुग्णांची प्रकृती गंभीर रुग्ण असुन, ४६१ जणांना अाॅक्सिजन पुरवठा केला जात आहे. आजपर्यंत एकुण ४ लाख ७६ हजार ८२६ जणांना काेराेनाची लागण झाली हाेती, त्यापैकी ४ लाख ६५ हजार ७५६ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. तर आजपर्यंत एकुण ८ हजार ५५४ जणांचा बळी गेला आहे.