fraud

तक्रारदार बांधकाम व्यावसायिक आहेत. ते राहण्यास शिवाजीनगर भागात आहेत. दरम्यान त्यांचा वानवडी परिसरात एक बांधकाम प्रकल्प सुरू आहे. ही कमर्शियल इमारत आहे. त्यावेळी या दोघांनी संगनमत केले. तसेच बापू शिंदेने तक्रारदार यांच्याकडे या प्रकल्पातील एक मोफत ऑफिस किंवा ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास हा प्रकल्प बेकायदेशीर बांधला असून, त्याबाबत पोलीस व इतर ठिकाणी तक्रार करण्याची धमकी दिली, असल्याचे या तक्रारीत म्हंटले आहे. 

    पुणे : पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकाला दोन व्यक्तींनी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. वकील नसतानाही वकीलीची बनावट सनद पीएमसी कोर्टात दिले व १० लाख रुपये फी स्वरूपात घेतले आणि एका फ्लॅटचा ताबा घेऊन त्या ठिकाणी सामान ठेवले आहे. तर दुसऱ्याने प्रकल्पात मोफत ऑफिस किंवा ५० लाखाची खंडणी मागितली आहे.

    याप्रकरणी राजेश उर्फ बॉबी खैरातीलाल बजाज (रा. डेक्कन) आणि बापू गोरख शिंदे (रा. नर्हे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रवींद्र सांकला (वय ५९) यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार २०१४ ते २०२१ या कालावधीत घडला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार बांधकाम व्यावसायिक आहेत. ते राहण्यास शिवाजीनगर भागात आहेत. दरम्यान त्यांचा वानवडी परिसरात एक बांधकाम प्रकल्प सुरू आहे. ही कमर्शियल इमारत आहे. त्यावेळी या दोघांनी संगनमत केले. तसेच बापू शिंदेने तक्रारदार यांच्याकडे या प्रकल्पातील एक मोफत ऑफिस किंवा ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास हा प्रकल्प बेकायदेशीर बांधला असून, त्याबाबत पोलीस व इतर ठिकाणी तक्रार करण्याची धमकी दिली, असल्याचे या तक्रारीत म्हंटले आहे.

    तसेच, राजेश उर्फ बॉबी याने तो वकील नसतानाही तक्रारदार यांना वकील असल्याचे सांगितले. सिव्हिल कोर्ट पीएमसी येथे बनावट वकीलपत्र फिर्यादिंच्या वतीने दिले. त्याबदल्यात त्यांच्याकडून वेळोवेळी ९ लाख ९० हजार रुपये फी म्हणून घेतले. तर येथील गृहप्रकल्पातील फ्लॅटचा ताबा जबरदस्तीने घेऊन त्यात साहित्य ठेवून, फसवणूक केली आहे. याबाबत तक्रारदार यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.