action on man not wearing mask

कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ११७० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून एकूण ३२८८५५ रुपये दंड वसूल करण्यात आला. हि कारवाई येरवडा व विश्रांतवाडी परिसरात करण्यात आली.सदरची कारवाई उप आयुक्त परिमंडळ कार्यालय क्र.१ संजय गावडे व सह आयुक्त वैभव कडलख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

    येरवडा :  येरवडा कळस धानोरी क्षत्रिय कार्यालय अंतर्गत कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या नागरिकांवर येरवडा क्षत्रिय कार्यालय अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. सद्य परिस्थितीत कोरोना प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी म्हणून येरवडा क्षत्रिय कार्यालय अंतर्गत जे नागरिक मास्क परिधान करत नाही अश्या ३७८ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण १८९०००/ रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच जे नागरिक शाररिक अंतर पाळत नाही व रस्त्यावर थुंकतात अश्या ७९२ नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच त्यांच्याकडून एकूण १३९८५५/रुपये दंड वसूल करण्यात आला.
    कोरोनाच्य नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ११७० नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून एकूण ३२८८५५ रुपये दंड वसूल करण्यात आला. हि कारवाई येरवडा व विश्रांतवाडी परिसरात करण्यात आली.सदरची कारवाई उप आयुक्त परिमंडळ कार्यालय क्र.१ संजय गावडे व सह आयुक्त वैभव कडलख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाई करण्यात वरिष्ठ आरोग्य निरीक्षक अनिल डमाळे, संजय घावटे यांचा सहभाग होता.कारवाई करता वेळेस कोरोणाच्या बाबतीत जनजागृती करण्यात आली व नागरिकांना नियम पळण्याचे विनंती करण्यात आली.