
केवळ कन्फर्म तिकीट असणाऱ्यांना रेल्वेगाड्यांत प्रवेश मिळेल. एनटीईएस या अॅपवरूनही रेल्वेची तिकिटे आणि आरक्षण प्रवाशांना उपलब्ध होईल,अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले.
पुणे : देशाच्या विविध भागांतील कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे रेल्वेने अनेक मार्गांवरील गाड्यांची वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुण्यापासून सुटणाऱ्या प्रमुख सात मार्गावरील वाहतूक १ जुलैपासून टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. नागपूर मार्गावर रेल्वेने तीन गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अहमदाबाद, काझीपेठ, मुंबई, कोल्हापूर-नागपूर, अमरावती आदी मार्गांवरील रेल्वे वाहतूक आता पूर्ववत करण्यात येत आहे. प्रवासी संख्या वाढेल त्या प्रमाणात गाड्यांच्या संख्येत वाढ होईल, असे रेल्वे स्पष्ट केले आहे. तसेच या मार्गांव पुण्यावरून सुटणाऱ्या आणि परतीच्य गाड्यांचेही आरक्षण खुले झाले आहे. काही गाड्या आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा सुटणार आहेत. त्यांची माहिती रेल्वेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. केवळ कन्फर्म तिकीट असणाऱ्यांना रेल्वेगाड्यांत प्रवेश मिळेल. एनटीईएस या अॅपवरूनही रेल्वेची तिकिटे आणि आरक्षण प्रवाशांना उपलब्ध होईल,अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले.