पुणे शहरात अभिनेत्रीवर बलात्कार ; ब्ल्यू फिल्म बनविण्याची धमकी देत मागितली खंडणी

-मेसर्स बॉलिवूड फिल्म इक्विपमेंटच्या राजेश माल्या, अभिजित साठेसह तिघांवर गुन्हा

    पुणे : हडपसरमधील एका २५ वर्षीय कलाकार तरुणीशी शारिरीक संबंध ठेवून त्याच्या एकांतातील फोटो व्हायरल करण्याची तसेच ब्ल्यु फिल्म बनविण्याची धमकी देऊन १० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे.

    याप्रकरणी मेसर्स बॉलिवूड फिल्म इक्विपमेंटचा राजेश माल्या, अभिजित गणपत साठे (वय ३४, रा. वारजे) व त्याची औंध येथील बहिण अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत तरुणीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार जुलै २०१७ पासून २१ जुलै २०२१ दरम्यान घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी काही लघुपटात व मॉडेल म्हणून काम केलेले आहे. यामाध्यमातून तरुणीची अभिजित साठेसोबत ओळख झाली होती.

    त्याने तरुणीशी ओळख वाढवत वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. त्यांच्या दोघांच्या एकांतातील फोटो व्हायरल करण्याची व ब्ल्यु फिल्म बनविण्याची धमकी दिली. साठेने शरीर संबंध ठेवले व इतरांनी संगनमत करुन फिर्यादीस चित्रपटात काम देतो, फोटो शुट कंपनी काढु इत्यादी भुलथापा दिल्या. त्यामाध्यमातून तरुणीकडून वेळोवेळी ६ लाख ४१ हजार रुपये घेतले. ते परत न देता त्याचा अपहारकरून तरुणीला साठे व तिचा फोटो व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी देऊन आणखी १० लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यात एका वकिलांनी तडजोड करण्यासाठी जबरदस्तीने ब्लॅकमेल करुन नोटरी केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास वारजे पोलीस करत आहेत.
    राजेश माल्या यांची मुंबईत मेसर्स बॉलीवूड फिल्म इक्विपमेंट ही चित्रपटांना कॅमेरा आणि लाईटिंगचे साहित्य भाड्याने पुरविणारी सर्वात मोठी कंपनी आहे. पोलीस उपनिरीक्षक कथले अधिक तपास करीत आहेत.