ukdiche modak

    पुणे : या सणासुदीच्या काळात उत्सवाला एक आरोग्यदायी वळण देत जगातील सर्वात मोठी वैज्ञानिक तथ्यावर आधारित कंपनी आयुर्वेद प्रमुख डाबर इंडिया लिमिटेडने आज गणपती रत्न मोदक लाँच करण्याची घोषणा केली आहे.

    डाबर रत्न मोदक ही आयुर्वेदिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या डाबर रत्नप्राशचा वापर करून विशेषतः गणेश चतुर्थी साठी बनवलेली मिठाई आहे. “मजबूत इम्यूनिटीचा आशीर्वाद – रत्नप्राश इम्यूनिटी मोदक” हे विशेष ग्राहक उपक्रमाअंतर्गत बनविले गेले आहेत. पुणे आणि हैदराबाद येथील गणेश मंडळांमध्ये दर्शनासाठी येणार्या भक्तांसाठी गणपती रत्नमोदक ठेवण्यात आले आहे. गणपती रत्नमोदक हे डाबर रतनप्राश आणि पारंपारिक मिठाई यांचे संयोजन आहे, रोगांपासून बचाव करणार्या रोगप्रतिकार शक्तीसह चवीचे निरोगी मिश्रण असलेले हे मोदक या वर्षीच्या पूजेसाठी उपलब्ध आहेत.

    या नवीन उपक्रमाबद्दल बोलताना, डॉ.दुर्गा प्रसाद (मार्केटिंग हेड, एथिकल्स, डाबर इंडिया लिमिटेड) म्हणाले, “कोविडचा उद्रेक झाल्यापासून, आरोग्य सुरक्षा हिच देशभरातील ग्राहकांसाठी सर्वात महत्वाची आहे. यावर्षी सणांचे आयोजनही कोविड प्रतिबंधांखाली केले जात आहे . यासाठी अतिरिक्त काळजी आणि खबरदारी घेणे महत्वाचे आहे. गणेश रत्नमोदक खास आमच्या प्रीमियम इम्यूनिटी बूस्टर डाबर रत्नप्राशचा वापर करून बनविण्यात आले आहे. जे उत्सवात आरोग्यदायी बदल आणतात आणि याचबरोबर गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गणेश मंडळांना भेट देणाऱ्या भक्तांसाठी प्रतिकारशक्तीची ढाल बनतात. आम्ही या शहरांमध्ये गणेश मंडळांना भेट देण्यासाठी येणार्या, कलाकार आणि पोलिस कर्मचाऱ्यांना रत्नमोदकांचे वितरण करू. ”

    लोकांना लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याबरोबरच, कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी विशेष शिबिरे देखील आयोजित केली जात आहेत. रजत माथूर, एजीएम-कंज्युमर मार्केटिंग, डाबर इंडिया लिमिटेड म्हणाले की, “गणपतीला कोणत्याही नवीन आरंभाची देवता मानले जाते, गणपतीचे भक्त गणेश चतुर्थीच्या सणाला जीवनात नवीन गोष्टींची सुरुवात करण्याचे प्रतिक मानतात. या गणेश पूजेत गणेश रत्न मोदक दोन सर्वात प्रमुख ठिकाणी भक्तांना अर्पण करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. यासोबतच रत्नप्राशचे लाभ लोकांना गणपती रत्न मोदकांच्या प्रसादच्या स्वरूपात दिले जात आहेत .