डिजिटल सातबाराचा विक्रम ; एका दिवसात ७२ हजार ७०० डाऊनलोड

२३ लाख रुपयांचा महसूल एकाच दिवसात प्राप्त

  पुणे : राज्यात सोमवारी एकाच दिवसात विक्रमी ७२ हजार ७०० डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आणि खाते उतारे नागरिकांनी डाऊनलोड केले. या माध्यमातून राज्य शासनाला २३ लाख रुपयांचा महसूल एकाच दिवसात प्राप्त झाला.यापूर्वी १६ जून रोजी ६२ हजार उतारे डाऊनलोड करण्यात आले होते. त्यामुळे राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी सातबारा संगणकीकरण आणि ई-फे रफार प्रकल्पाला यश मिळताना दिसत आहे.

  याबाबत ई-फे रफार प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप म्हणाले, ‘सामान्य शेतकऱ्यांना केव्हाही आणि कु ठेही (पान २ वर) (पान १ वरून) सातबारा व खाते उतारे उपलब्ध करून देण्यासाठी सुरू के लेल्या महाभूमी संके तस्थळावरून सोमवारी (२१ जून) आतापर्यंतची उच्चांकी सेवा देण्यात आली. एका दिवसात तब्बल ७२ हजार ७०० डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा आणि खाते उतारे डाऊनलोड करण्यात आले. तलाठी कार्यालयातून दोन लाख ४८ हजार सातबारा व खाते उतारे वितरित करण्यात आले, तर बँकांमधून दोन्ही प्रकारचे मिळून ५६०० उतारे घेतले गेले. भूलेखवरून चार लाख पाच हजार विनास्वाक्षरित विनाशुल्क (फक्त माहितीसाठी) सातबारा, खाते उतारे घेण्यात आले. एका दिवसात २३ लाख रुपयांचा महसूल नक्कल शुल्क स्वरूपात जमा झाला आहे.’

  कारणे काय?
  महसूल विभागाकडून जास्तीत जास्त सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्याचा लाभ अधिकाधिक तंत्रसाक्षर होत असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना होत आहे. आतापर्यंत डिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा उतारा, फेरफार उतारा, आठ-अ खाते उतारा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आला. चालू वर्षांत मार्च महिन्यात चार वेळा आणि एप्रिल महिन्यात तीन वेळा मोठय़ा संख्येने उतारे नागरिकांनी डाऊनलोड केले.

  चालू वर्षांत एका दिवसात मोठय़ा संख्येने डाऊनलोड झालेले उतारे

  १६ जून : ६२ हजार
  २९ एप्रिल : २६ हजार ९६२
  १५ एप्रिल : ३३ हजार ४००
  ७ एप्रिल : ३८ हजार
  २६ मार्च : ३७ हजार ३००
  २२ मार्च : ३३ हजार
  १६ मार्च : ४० हजार २००
  १५ मार्च : ३८ हजार
  २२ फे ब्रुवारी : ४६ हजार
  १७ फे ब्रुवारी : ३९ हजार
  २० जानेवारी : ३६ हजार