पोलीस निरीक्षकांच्या दप्तरी कार्यलयाचे रेकॉर्डिंग ; गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी एक जण अटकेत

तक्रारदार हे पोलीस हवालदार असून, कोंढवा पोलीस ठाण्यात त्यांची नेमणूक आहे. दरम्यान सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मोईंना हा कामानिमित्त आला होता. यादरम्यान त्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या दप्तरी कार्यालय येथे जाऊन त्यांच्य कर्यालयाची मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केली. पण हा प्रकार काही वेळातच लक्षात आला व पोलिसांची धावपळ उडाली.

    पुणे : पोलीस निरीक्षकांच्या दप्तरी कार्यलयाचे रेकॉर्डिंग करत गोपनीयतेचा भंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला आहे.याप्रकरणी मोईंना अब्दुल्ला शेख (वय ३५, रा. कोंढवा खुर्द) याला अटक केली आहे. याबाबत श्रीकांत शिरोळे यांनी तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पोलीस हवालदार असून, कोंढवा पोलीस ठाण्यात त्यांची नेमणूक आहे. दरम्यान सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मोईंना हा कामानिमित्त आला होता. यादरम्यान त्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या दप्तरी कार्यालय येथे जाऊन त्यांच्य कर्यालयाची मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केली. पण हा प्रकार काही वेळातच लक्षात आला व पोलिसांची धावपळ उडाली. मोबाईल जप्तकरत झालेलं रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर त्याच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान त्याला विचारपूस करण्यास सुरुवात केल्यानंतर त्याने मोठमोठ्याने आरडाओरडा करत गोंधळ घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.