आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरांसाठी २०० कोटीची मान्यता; डुडुळगाव येथे १३७८ घरे बांधणार

केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 'सर्वांसाठी घरे २०२२' ही योजना राबविण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार, पिंपरी - चिंचवड महापालिका हद्दीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्युएस) आणि बेघरांसाठी घरे (एचडीएच) या योजनांसाठी आरक्षित जागांवर घरे बांधण्याचे धोरण महापालिकेतर्फे राबविण्यात येत आहे.

    पिंपरी: पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी – चिंचवड महापालिकेच्यावतीने डुडुळगाव येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १३७८ घरे बांधण्याचे नियोजन आहे. त्यासाठी राज्यस्तरीय दरसुची आणि महापालिकेच्या मंजुर दर पृथ्थकरणानुसार अंदाजपत्रकीय २०० कोटी रकमेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. महापालिका सभेत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

    केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ‘सर्वांसाठी घरे २०२२’ ही योजना राबविण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार, पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्युएस) आणि बेघरांसाठी घरे (एचडीएच) या योजनांसाठी आरक्षित जागांवर घरे बांधण्याचे धोरण महापालिकेतर्फे राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ईडब्ल्युएस अंतर्गत रावेत, दिघी, डुडुळगाव, मोशी – बोऱ्हाडेवाडी, चऱ्होली, वडमुखवाडी, चिखली येथे सुमारे बारा हेक्टर जागेवर आरक्षण आहे. तर, एचडीएच अंतर्गत पिंपरीत २ एकर २८ गुंठे जागेवर आणि आकुर्डीत १ हेक्टर ७८ गुंठे जागेवर आरक्षण आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत या आरक्षित जागांवर तब्बल ९ हजार ४५८ घरे बांधणे शक्य होणार आहे. या जागांवर १२ ते १४ मजली इमारती बांधण्यात येणार आहे. त्यासाठी ८८५ कोटी १२ लाख रुपये खर्च येणार आहे. डुडुळगाव येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १३७८ घरे बांधण्याचे नियोजन आहे. या कामासाठी २० जून २०१७ रोजी महापालिका सभेने मान्यता दिली आहे. हा ‘राव करताना या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम ही सन २०१६-१७ च्या जिल्हा दर सुचीप्रमाणे दर गृहित धरून काढण्यात आली होती.

    त्यावेळी अंदाजपत्रकीय खर्च ७४ कोटी १३ लाख ९० हजार रूपये  आला होता. अंदाजपत्रक बनविण्यासाठी आवश्यक लागणारे सर्व ना हरकत दाखले घेण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. या कामाचे अंदाजपत्रक सन २०२०-२१ च्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडील राज्यस्तरीय दरसुची आणि पिंपरी महापालिकेच्या मंजुर दर पृथ्थकरणानुसार करण्यात येत आहे. त्यासाठी अंदाजपत्रकीय खर्च २०० कोटी इतका येणार आहे. परंतु, सन २०२०-२१ च्या मुळ अंदाजपत्रकात या कामाची अंदाजपत्रकीय रक्कम ९० कोटी असल्यामुळे या रकमेस तांत्रिक मान्यता घेण्यात येणार आहे. तसेच सरकारकडे सविस्तर प्रकल्प अहवाल पा’विणे शक्य नसल्याने राज्यस्तरीय दरसुची आणि पिंपरी महापालिकेच्या मंजुर दर पृथ्थकरणानुसार अंदाजपत्रकीय २०० कोटी रकमेस प्रशासकीय मान्यता मिळण्याच्या प्रस्तावास महापालिका सभेत मंजुरी देण्यात आली.

    बेघरांसाठी घरांच्या जागेत पाण्याची टाकी बांधणार

    पिंपळे-गुरव (प्रभाग क्रमांक २९) येथील वैदुवस्ती – भैरवनाथनगर, गणेशनगर, आणि सुदर्शननगर परिसर हा भौगोलीकदृष्ट्या उंचावर असल्याने या ‘िकाणी नागरिकांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. परिसरात पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी उंच पाण्याची टाकी बांधणे आवश्यक आहे. परंतु, सद्यस्थितीत या भागात मोकळी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे परिसरात उपलब्ध असलेल्या बेघरांसाठी घरे या आरक्षित जागेमध्ये पाण्याची उंच टाकी बांधण्यात येणार आहे. तसेच नवी सांगवी (प्रभाग क्रमांक ३१) परिसरातही नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्या जाणवत आहेत. त्यामुळे या परिसरात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेच्या आरक्षणावर पाण्याची उंच टाकी बांधण्यात येणार आहे.