पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांसाठी ६४४ कोटींचा आराखडा ; जिल्ह्यात ४०६ पर्यटन स्थळे , २८८ जाेडरस्ते बांधावे लागणार

जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना त्यांच्या गावातील पर्यटन स्थळांची माहीती पाठविण्याचे आवाहन केले हाेते. ही माहीती ऑनलाईन जमा केली गेली. यामध्ये पुणे जिल्ह्यात ४०६ पर्यटन स्थळे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  पुणे : पुणे जिल्ह्यात ४०६ पर्यटनस्थळे असून, यांच्या विकासाकरीता सुमारे ६४४ काेटी रुपयांचा सर्वंकष आराखडा तयार करण्यात आला आहे. लाेणावळा येथे स्कायवाॅक उभारण्याच्या प्रकल्पाचा या प्रस्तावात समावेश आहे.

  जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना त्यांच्या गावातील पर्यटन स्थळांची माहीती पाठविण्याचे आवाहन केले हाेते. ही माहीती ऑनलाईन जमा केली गेली. यामध्ये पुणे जिल्ह्यात ४०६ पर्यटन स्थळे असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आधारे पर्यटनस्थळांचा सर्वकष आराखडा तयार केला जात आहे. याठिकाणी काेणत्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात याची माहिती आराखड्यात नमूद केली आहे. तसेच त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली गेली आहे. यामध्ये धार्मिकस्थळे, एैतिहासिक वारसा असलेली ठिकाणी, पिकनिक पाॅईंट, निसर्गरम्य जागा आदींचा समावेश आहे. या पर्यटनस्थळंाना जाेडण्यासाठी २८८ जाेडरस्ते बांधावे लागणार आहे. त्याकरीता २२ हजार ६७२ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. १९२ ठिकाणी रॅम्प उभारावे लागणार असून, त्याकरीता ३ हजार १४० लाख रुपये, ५७ ठिकाणी राेपवे बांधणीसाठी ८ हजार ६८८ लाख रुपये, २७८ ठिकाणी वीज पुरवठ्याकरीता ३ हजार १९१ लाख रुपये, २७८ ठिकाणी पार्किंग सुविधा उभी करण्याकरीता ३ हजार ६४ लाख रुपये, ३ ११ ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्याकरीता २ हजार २७९ लाख रुपये, ३५४ठिकाणी दिशादर्शक फलकांकरीता ८ हजार ७९८ लाख रुपये, ३२० ठिकाणी सीसीटिव्ही यंत्रणा उभारण्याकरीता १ हजार ३८६ लाख रुपये, २०४ ठिकाणी इतर सुविधा उभ्या करण्यासाठी ११ हजार २६९ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

  – तालुकानिहाय पर्यटन स्थळे (संख्या कंसात)
  जुन्नर ( ६२), आंबेगाव ( २५), खेड ( ३७), मावळ ( ४०),िशरुर (२५), हवेली ( २४), मुळशी ९ २७), वेल्हा (२३), भाेर ( ३२ ), पुरंदर ( २९),दाैंड ( १५), बारामती (२२), इंदापुर (४५).

  -जिल्ह्यात पर्यटन स्थळांची विविधता असून, त्याची आकडेवारी पुढील प्रमाणे ( संख्या कंसात )
  तीर्थक्षेत्र ( २१०),पर्यटन केंद्र (४१), धरण ( ३४), निसर्गरम्य ठीकाण ( २४), किल्ला ( १८),पिकनिक पाॅईंट ( १८),धबधबा ( १३), ट्रेक पाॅईंट ( १२), हेरिटेज ( १२), अभयारण्य (२), इतर ( २५).