एक डोस घेतला असल्यास विद्यार्थ्यांना आरटीपीसीआर बंधनकारक

स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या संघातील विद्यार्थ्यांना लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा एक डोस घेतला असल्यास आरटीपीसीआरचा रिपोर्ट महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेकडे जमा करणे बंधनकारक आहे. पुरुषोत्तम करंडक स्पर्धा यंदा होणार आहे.

    पुणे: सोमवारपासून (३ जानेवारी) ‘पुरुषोत्तम’ करंडक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तालमीही सुरू झाल्या आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेमध्ये कोरोना नियमांचे पालन केले जाणार असून स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या संघातील विद्यार्थ्यांना लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा एक डोस घेतला असल्यास आरटीपीसीआरचा रिपोर्ट महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेकडे जमा करणे बंधनकारक आहे.पुरुषोत्तम करंडक स्पर्धा यंदा होणार आहे. महाविद्यालये आणि नाट्यगृह खुली झाल्याने ही स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेने घेतला आहे. त्यानुसार येत्या ३ जानेवारीपासून स्पर्धेच्या पहिल्या फेरीला प्रारंभ होणार आहे.

    ‘पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची अंतर्गत तारीख १ ते १७ जानेवारी निश्चित करण्यात आली होती. ६३ एकांकिकांसाठी भरत नाट्य मंदिरचे बुकिंग करण्यात आले होते. प्रत्यक्षात नेहमीप्रमाणे ५० संघानीच प्रवेश निश्चित केला. त्यामुळे ३ जानेवारीपासून स्पर्धा घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेचे मंगेश शिंदे यांनी सांगितले.”