खेडमध्ये ‘संगम कलेक्शन’चे जोरदार पुनरागमन

    राजगुरूनगर : ‘पुनश्‍च हरिओम’चा नारा देत खेडमध्ये संगम कलेक्शन या कापड दुकानाने जोरदार पुनरागमन केले आहे. आगीच्या दुर्घटनेनंतर उत्तर पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या राजगुरूनगर शहरातील संगम कलेक्‍शनमध्ये रेडिमेड कपडे, दिवाळी भेट व लग्न बस्त्यासाठी नागरिकांनी कपडे खरेदीला पसंती दिली आहे.

    कोरोना संसर्ग आटोक्‍यात आल्याने पुन्हा लग्नसराई जोमाने सुरू झाली. लग्न समारंभासाठी वधू-वरासाठी विविध प्रकारच्या कपड्यांच्या व्हरायटी संगम कलेक्‍शनमध्ये उपलब्ध असल्याने वधू-वरांच्या पालकांकडून लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी संगम कलेक्‍शनला पसंती दिली आहे.

    बंगलोर बॉरकेट, सिल्क वर्क, धर्मावरंमच्या फॅन्सी टिशु साड्या, कांजीवरम सिल्कच्या साड्यांसह संगम कलेक्‍शनमध्ये असलेल्या नववधूच्या साखरपुड्यासाठी, हळदी, शुभ मुहूर्त सप्तपदीसाठी साडीला मोठी मागणी आहे. आधुनिक वधूकडून शालूऐवजी घागरा साडीला जास्त मागणी आहे. नववधूला सजविणाऱ्या सर्व प्रकारची कपडे, साड्यामधील विविध डिझाईन येथे उपलब्ध आहेत. महिलांसाठी नाविन्यपूर्ण व्हरायटीचे अद्ययावत शोरूम संगम कलेक्‍शनमध्ये उभारण्यात आले आहे. यावर्षी कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने यंदाची दिवाळी नागरिकांसाठी चांगली आहे.

    दिवाळीत आपल्या कुटुंबासाठी विविध कपडे खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. दिवाळीचे औचित्य साधून कपडे खरेदीनंतर खरेदीदाराला चांगले गिफ्ट देण्यात येत आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, मावळ आणि हवेली तालुक्‍यातील नागरिकांची राजगुरूनगर शहरातील संगम कलेक्‍शनमध्ये कपडे खरेदीला मोठी पसंती आहे.

    कोणतेही सण असो, लग्न सराई असो अथवा लग्नाचे बस्ते असोत संगम कलेक्‍शन हे कपड्यांचे दुकान जनसामान्य माणसांच्या मनात भरले आहे.

    विविध व्हरायटी, चांगल्या प्रतीची कपडे आणि वाजवी दर यामुळे येथे नागरिकांची पसंती आहे. संगम कलेक्‍शन १९७२ पासून ग्राहकांना अविरत सेवा देत आहे.

    देशातील विविध कपड्याच्या बाजारपेठेतील कपडे या दुकानात ठेवण्यात आली आहेत. लहान मुलांचे आणि महिलांचे कपडे खरेदीचे हे एक प्रमुख केंद्र बनले आहे. १९७२ पासून राजगुरूनगर येथे कपड्याच्या दुकानाची परंपरा कायम आहे.

    सर्व व्हरायटी उपलब्ध : भन्साळी

    वर्षानुवर्षे ग्राहकांना त्यांच्या पसंतीची देशातील विविध बाजारपेठेतील कपडे विक्रीला ठेवली आहेत. आगीच्या दुर्घटनेनंतरही ग्राहकांसाठी चांगल्या दर्जाची, विविध व्हरायटीची आणि ग्राहकांना परवडतील अशा किमतीत कपडे विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. कोरोनामुळे थांबलेली लग्नसराई जोशात सुरू झाल्याने वधूवरांचे बस्ते बांधण्यासाठी नागरिकांची पसंती आहे. नवरीसाठी साखरपुडा, हळद, शुभमुहूर्त व सप्तपदीसाठी विविध व्हरायटीच्या साड्या उपलब्ध केल्या आहेत, अशी माहिती संगम क्‍लॉथ सेंटरचे विजय भन्साळी (माजी उपसरपंच) व आशिष भन्साळी (रोटरी क्लब पदाधिकारी) यांनी दिली.

    महिलांसह लहान मुले, तरुण, तरुणींसाठी खास कलेक्‍शन

    महिलांच्या पसंतीचे कपड्यांचे दुकान म्हणून जिल्हाभर संगम कलेक्‍शन प्रसिद्ध झाले आहे. सणासुद, लग्न सराईमध्ये विविध भागातील महिला पैठणी खरेदीसाठी येतात. या दुकानातील वर्क (अम्ब्रोयडरी) साड्यांना जास्त मागणी आहे. या दुकानात ५०० रुपयांपासून ते २५ हजारांपर्यंत पैठणी ठेवण्यात आल्या आहेत.

    पैठणीची क्रेझ जास्त असल्याने बंगलोर सिल्क, कांझीवरम, येवला, बनारस आदी प्रकराच्या पैठणी उपलब्ध आहेत. हॅडलुम कॉटनच्या व्हरायटी जास्त असून कोईमतूर, मदुराई, बनारस या महत्त्वाच्या बाजारपेठेतील साड्या विक्रीला ठेवण्यात आल्या आहेत.

    लेडीज जीन्स, टॉप, पंजाबी, ड्रेस मटेरियलच्या विविध व्हरायटी ठेवण्यात आल्या आहेत.

    डेनियम जीन्सला युवकांची मोठी मागणी असल्याने विविध रंगातील जीन्स मोठ्या प्रमाणात विक्रीला आहेत. लहान मुलांच्या बाबला बाबला सूट, कोट, सुटस खरेदीला ग्राहकांची सर्वाधिक पसंती आहे.