
नवरात्र उत्सवानिमित्त मावळ विचार मंच आयोजित १५ ते २३ ऑक्टोंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ६.३० वाजता पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात ‘सरस्वती व्याख्यानमाला’चे आयोजन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या व्याख्यानांचा लाभ या निमित्ताने मिळणार आहे, अशी माहिती मावळ विचार मंच संस्थापक भास्करराव म्हाळसकर डॉ.रवींद्र आचार्य अध्यक्ष श्रीराम ढोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
वडगाव मावळ : येथील नवरात्र उत्सवानिमित्त मावळ विचार मंच आयोजित १५ ते २३ ऑक्टोंबर या कालावधीत दररोज सायंकाळी ६.३० वाजता पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात ‘सरस्वती व्याख्यानमाला’चे आयोजन करण्यात आले आहे. वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या व्याख्यानांचा लाभ या निमित्ताने मिळणार आहे, अशी माहिती मावळ विचार मंच संस्थापक भास्करराव म्हाळसकर डॉ.रवींद्र आचार्य अध्यक्ष श्रीराम ढोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
व्याख्यानमालेचे पहिले पुष्प रविवारी आय एस अधिकारी ज्ञानदास डॉ विजयकुमार फड प्रमुख वक्ते असणार आहेत.(गीता-ज्ञानेशवरी जीवसृष्टी ) या विषयावर व्याख्यान होणार आहे.अध्यक्षस्थानी माजी आमदार मेधाताई कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प जयश्रीताई येवले असणार आहेत.त्यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे.
सोमवार दि १६ ऑक्टोंबर रोजी संपादक उदय निरगुडकर (सन २०४७ चा भारत ) १७ तारखेला सिने अभिनेता अजय पुरकर (पावनखिंड) दि १८ सिनेअभिनेत्री मृणाल कुलकर्णी (माझा अभिनय प्रवास) १९ तारखेला वारणानगर कोल्हापूर येथील प्राध्यापक आप्पासाहेब खोत (कथाकथन) २० तारखेला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मिलिंद जोशी (जीवनातील विनोदाचे स्थान) २१ तारखेला उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक (मी कसा घडलो) २२ तारखेला महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार सत्यजित तांबे ( भारताची खरु गरज आर्थिक व राजकीय साक्षरता) २३ तारखेला प्रसिद्ध कवी राजू उगले व अरूण इंगळे ( कवी संमेलन) या विषयांवर व्याख्यान होणार आहे. हे व्याख्यानमाला पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात होईल.नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
या व्याख्यानमालेचा कार्यक्रमानिमित्त माजी आमदार मेधा कुलकर्णी, संपादक सुरेश साखरवळकर,पुणे ग्रामीण सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, चिंचवड विधानसभेचे आमदार अश्विनी जगताप, उद्योजक रामदास काकडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे ,खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आमदार सुनील शेळके आदी मान्यवर यावेळी अध्यक्षस्थानी असणार आहेत.
तर ह भ.प जयश्रीताई येवले मुंबई पोलीस अधिकारी किरण काळे, महावितरण कंपनीच्या मुख्य अभियंता राजेंद्र पवार भाजपाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब गुंड, मुबारक खान, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, भाजप राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, मानव संसाधन विभाग प्रमुख संतोष राउत मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू, पोलीस अधिकारी,आदीचा सत्कार करण्यात येणार आहे तसेच वेटलिफ्टिंग स्पर्धेतील खेळाडूंचा सत्कार होणार आहे. २४ ऑक्टोंबरला विजयादशमीच्या दिवशी भारतमातेच्या प्रतिमेची मिरवणूक काढून कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
या पत्रकार परिषदेला मावळ विचार मंचाचे अध्यक्ष श्रीराम ढोरे कार्याध्यक्ष अर्चना कुडे, कार्यक्रम प्रमुख सारिका भिलारे, उपाध्यक्ष प्रतिक चव्हाण, सचिव श्रीधर चव्हाण,खनिजदार रविंद्र म्हाळसकर वैशाली शाम ढोरे, हर्षदा दुबे आदी पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी डॉ सुनील बाफना प्रभाकर ओव्हाळ गिरीश गुजरणी अँड विजय जाधव,अरुण वाघमारे भूषण मुथा अनंता कुडे,अतुल राऊत,अरुण वाघमारे ,नंदकिशोर गाडे,आदीजण पंढरीनाथ भिलारे,यावेळी उपस्थित होते.