sawai gandharv mahotsav

पुण्यातील प्रसिद्ध सवाई गंधर्व भीमसेन (Sawai Gandharva Bhimsen Mahotsav Cancelled) महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थितीनुसार वेळोवेळी बदलण्यात येत असलेली नियमावलीमुळे अनिश्चितता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर येत्या २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात येत असलेला ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्यात आला आहे.

    पुणे : सगळीकडे सध्या कोरोना रुग्णांची (Corona Spread) संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने नवे नियम जाहीर केले आहेत. या नियमांमुळे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आता पुण्यातील प्रसिद्ध सवाई गंधर्व भीमसेन (Sawai Gandharva Bhimsen Mahotsav Cancelled) महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिस्थितीनुसार वेळोवेळी बदलण्यात येत असलेली नियमावलीमुळे अनिश्चितता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर येत्या २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात येत असलेला ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष आणि पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र श्रीनिवास जोशी यांनी दिली आहे.

    यंदा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे जन्म शताब्दी वर्ष असल्याने महोत्सव व्हावा अशी अनेकांची इच्छा होती. मात्र महोत्सवाची भव्यता, व्याप्ती आणि आयोजनासाठी लागणारा वेळ बघता सध्याच्या परिस्थितीत महोत्सव रद्द करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नसल्याचे श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.

    दरम्यान, किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या आयोजनाने व्हावी, या भावनेने फेब्रुवारीमधील तारखा निश्चित करण्यात आल्याची माहिती याआधी देण्यात आली होती. त्यावेळी राज्य सरकारची जी नियमावली असेल तिचे पालन करून महोत्सवाचे आयोजन केले जाईल, अशी माहिती  श्रीनिवास जोशी यांनी दिली होती.

    कोरोना निर्बंधांमुळे गेल्या वर्षी आयोजन करणे शक्य झाले नाही. या वर्षीही खुल्या मैदानातील कार्यक्रमांसाठी २५ टक्के प्रेक्षकांची अट महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात अडचणीची आहे.