‘देश मागे गेला, म्हणजे या देशातील शेतकरी मागे गेला’ शेतकरी आंदोलनावर अभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले  मत

आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. शेतकरी पुढे गेला तरच देश पुढे गेला हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे”. ज्याअर्थी आपल्या देशातील शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे त्याअर्थी देश खूप मागे चालला आहे- सयाजी शिंदे

पिंपरी:‘एक देश मागे गेला म्हणजे या देशातील शेतकरी मागे गेला. देश पुढे गेला म्हणजे एक शेतकरी पुढे गेला’. ज्याअर्थी आपल्या देशातील शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे त्याअर्थी देश खूप मागे चालला आहे. आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, ,असे रोखठोक मत मराठी अभिनेते यांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना व्यक्त केले आहे.

दरम्यान अभिनेते सयाजी शिंदे बुधवारी पिंपरी-चिंचवडमध्ये पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेण्यासाठी आले होते. भेटीनंतर ते पत्रकारांशी संवाद साधला. आंतरराष्ट्रीय शेतकरी दिनाच्या निमित्ताने शेतकरी आंदोलनाबाबत विचारले असता त्यांनी दाक्षिणत्या चित्रपटातील एक डायलॉग ऐकविला.

एक देश मागे गेला म्हणजे या देशातील शेतकरी मागे गेला असं यावेळी ते म्हणाले. त्यांनी सांगितलं की, “एक देश मागे गेला म्हणजे या देशातील शेतकरी मागे गेला. देश पुढे गेला म्हणजे एक शेतकरी पुढे गेला. ज्याअर्थी आपल्या देशातील शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे त्याअर्थी देश खूप मागे चालला आहे. आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. शेतकरी पुढे गेला तरच देश पुढे गेला हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे”.

“दरम्यान, १२ वर्षांपूर्व महानगरपालिकेकडून एक एकर चाळीस गुंठे जागा निमा या संस्थेने २१ वर्षांचा करारनामा करून घेतली होती. गेल्या बारा वर्षात संबंधित ओसाड जागेत निमा संस्थेने वनराई फुलवली असून साडेचारशे वनस्पती लावण्यात आलेल्या आहेत. मात्र, अचानक सदरची जागा एमआयडीसीने विकल्याचं सांगून काही जण महानगरपालिकडे झाड तोडण्यास सांगत आहेत. मुख्य मुद्दा हा आहे की साडेचारशे झाडांचा बळी चालला आहे. मात्र, तीच झाडं मनुष्य तोडायला निघाला आहे ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. ती झाडं वाचवायची आहेत. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,” असं सयाजी शिंदे म्हणाले. यावेळी भाजप चे प्रदेश सचिव अमित गोरखे, धनजय शेडबाले, तुषार शिंदे, नगरसेविका अनुराधा गोरखे तसेच निमा संघटनेचे डॉ महेश पाटील, डॉ तांबिले आणि सर्व डॉक्टर पदाधिकारी उपस्थित होते

गेल्या २८ दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी मंगळवारी शेतकरी संघटनांना चर्चेचं आवाहन केलं. मात्र, दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांनी केंद्राला प्रतिसाद दिलेला नाही. केंद्राशी बोलणी करून काही निष्पन्न होत नसल्याचे या नेत्यांचे म्हणणे असून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.