उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत त्यांचे अनेक कार्यकर्तेही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत पक्ष प्रेवश केल्यानंतर रुपाली पाटील यांना कोणती जबाबदारी मिळणार, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.
शहरातील मनसेच्या फायरब्रँड नेत्या अशी ओळख असलेल्या रुपाली पाटील यांनी मनसेला अखेर जय महाराष्ट्र केला. पाटील यांनी पत्रकार परिषद घेत त्याबाबत घोषणा केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येण्यापूर्वीच रुपाली पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानं मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे. आता रुपाली पाटील कोणत्या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र, आता पाटील या हाती घड्याळ बांधणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थित पाटील यांचा आज मुंबईमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची शक्यता आहे. याबाबत tv9 मराठीने वृत्त दिले आहे.
दरम्यान, बुधवारी सकाळीच रुपाली पाटील यांनी मनसे पक्ष का सोडत असल्याचं स्पष्ट केलं. गेल्या काही दिवसांपासून मनसे नेत्या रुपाली पाटील या पुण्यातील मनसेचे नेते किशोर शिंदे आणि बाबू वागसकर यांच्यावर नाराज होत्या. या दोघांनाही काम नसून रिकामटेकडे असल्याची टीका त्यांनी पत्रकर परिषदेत केली आहे. त्यांनी याबाबत उघडपणे नाराजी देखील जाहीर व्यक्त केली होती. त्यांनंतर त्यांनी पक्षाच्या विविध कार्यक्रमाला देखील हजेरी लावली नव्हती.
उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत त्यांचे अनेक कार्यकर्तेही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत पक्ष प्रेवश केल्यानंतर रुपाली पाटील यांना कोणती जबाबदारी मिळणार, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.
रूपाली पाटील यांचा सगळा वाद सुरू झाला तो समीर वानखेडे प्रकरणावर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर… समीर वानखेडे यांनी दलितांवर अन्याय केल्याचे आरोप होत आहेत तर त्याची चौकशी करायला हवी अशी भूमिका त्यांनी घेतली होती. मात्र त्यावरून पक्षाचे उपनेते बाबू वागस्कर आणि रूपाली पाटील यांच्यात वाद झाला होता. प्रवक्ते पद नसताना रूपाली पाटील यांनी पक्षाच्या भूमिका मांडायला नको असं वागस्कर यांचं म्हणणं होतं. मात्र रुपाली पाटील यांनी त्याला जोरदार विरोध केला.