School starts from 9th to 12th from 4th January in Pune, big decision of Municipal Commissioner

शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करण्यासाठी थर्मल स्कॅनर किंवा थर्मल गन, पल्स ऑक्सिमीटर, जंतुनाशक, साबण, पाणी या आवश्यक वस्तू शाळा प्रशासनाने ठेवणं बंधनकारक आहे.

पुणे : पुण्यात (Pune) कोरोना परिस्थिती काही प्रमाणात आता नियंत्रणात आली आहे. पुण्यातील बहुतांश भाग हा आता पुर्ववत सुरु झाला आहे. त्यामुळे पुणे महापालिका क्षेत्रांतर्गत असलेल्या ९वी ते १२ वीच्या शाळा ४ जानेवारीपासून सुरु (School starts) करण्याचे आदेश पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत. राज्य सरकारने ९वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्याचे आधिकार स्थानिक प्रशासनाकडे दिले आहेत. त्यामुळे कोरोना काळातील सर्व नियमांचे पालन करुन या शाळा सुरु करण्याचा निर्णय पुणे माहापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.

शाळा सुरु करताना पाळण्यात येणारे नियम

शाळेत स्वच्छता व निर्जंतुकीकरण विषयक सुविधा सुनिश्चित करण्यासाठी थर्मल स्कॅनर किंवा थर्मल गन, पल्स ऑक्सिमीटर, जंतुनाशक, साबण, पाणी या आवश्यक वस्तू शाळा प्रशासनाने ठेवणं बंधनकारक आहे.

शाळा वाहतूक सुविधांचेही निर्जंतुकीकरण नियमित करण्यात यावं. याबाबत उपाययोजना करणं आवश्यक आहे. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोव्हिड साठीची RTPCR चाचणी बंधनकारक आहे. चाचणीचे प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनाने परिमंडळ वैद्यकीय अधिकारी व क्षेत्रीय वैद्यकीय अधिकाऱ्यांना सादर करणं आवश्यक आहे, असंही आयुक्तांनी म्हटलं आहे.

तसेच विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यासाठी पालकांची लेखील सहमती शाळा प्रशासनाला देणे आवश्यक आहे. शाळा आणि शाळेच्या आवारातील सफाई करणे आवश्यक आहे. शाळेतील स्वच्छतागृहांचे रोज निर्जंतुकीकरण करणं आवश्यक आहे.