पुण्यात ओमायक्रॉनचा दुसरा रुग्ण

 राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, पुण्यामध्ये कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. पुण्यातील ३९ वर्षीय महिलेला ओमायक्रॉनची लागण झाली असून, ही महिला दुबईहून पुण्यात दाखल झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

    पुणे : दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने आता महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर डोंबिवलीमध्ये १ रुग्ण तर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात १० रुग्ण आढळून आले होते. कालच नागपूरमध्ये एक जण ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. तर आज पुणे शहरात ओमायक्रॉनचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे. त्यानंतर आता प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.  राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार, पुण्यामध्ये कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. पुण्यातील ३९ वर्षीय महिलेला ओमायक्रॉनची लागण झाली असून, ही महिला दुबईहून पुण्यात दाखल झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. महिलेला सध्या कोणतीही लक्षणे नसून, तिचे लसीकरण पूर्ण झाले आहे. महिलेला सध्या विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.